Saturday, March 2, 2024

अभिनयानंतर आता दिग्दर्शनात नशीब आजमावणार ग्रीक गाॅड हृतिक रोशन?,म्हणाला,”…विचार करत आहे “

ग्रीक गाॅड अशी ओळख असणारा बाॅलिवूडचा अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या ‘फाइटर'(Fighter) चित्रपटामुळे चर्चेत आहे. 25 जानेवारीला रिलीज झालेला फाइटर चित्रपटाला प्रेक्षकांडुन चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचसोबत या चित्रपटाला प्रेक्षकांकडुन मिळणाऱ्या प्रतिक्रियाही चांगल्या आहेत.बाॅक्स ऑफिसवरही या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. हृतिक रोशनने त्याच्या कमालीच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. नुकत्याच झालेल्या एका चर्चेदरम्यान हृतिकला चित्रपटाच्या दिग्दर्शनाविषयी विचारल्यावर त्याने जरा हटके अंदाजात उत्तर दिलं.

चित्रपट दिग्दर्शन करण्याबाबतीत काय म्हणाला हृतिक
चित्रपट दिग्दर्शनाबाबत बोलताना हृतिक(greek God Hrutik Roshan) म्हणाला,” मी अजुन यावर विचार करतोय. मला खरंच माहिती नाही की दिग्दर्शन कसं करतात. मी अशा दिग्दर्शकांना पाहिलंय ज्यांना लेंसिंग बद्दल काही माहीती नव्हती. त्यांना माहिती नव्हते की लेंस काय आहे, आणि ते कसं दिसेल? त्या लोकांमध्ये अस काही आहे, जे इतरांपेक्षा खुप वेगळं आहे.ते खुप सहज म्हणतात की मी हा चित्रपट बनवणार आहे. मी दिग्दर्शन करण्यापुर्वी अजुन अनुभव घेऊ इच्छीतो.मला अजुन शिकण्याची गरज आहे.”

दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पणाचा करत आहे विचार
हृतिकला पुढे विचारलं गेलं की, तुम्ही दिग्दर्शन करू इच्छाता पण पुर्णपणे निश्चित नाही. त्यावर उत्तर देत अभिनेता बोलला,”माझ्याकडे याचं उत्तर नाही. मी दिग्दर्शनाबद्दल विचार करत आहे. जेव्हा आपण काही नविन करायला जातो तेव्हा मनात भीती असते. मी हे करु शकेल का नाही मनात असे अनेक विचार येतात. परंतु मला माहिती आहे मी हे करू शकतो.”

हृतिक रोशनचं वर्कफ्रंट
हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटचं नाव ‘वाॅर 2 ‘(War 2) असणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आयान मुखर्जी करत आहे. हा चित्रपट 2025 मध्ये चित्रपटगृहात रिलीज होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट वायआरएफ स्पाय युनिवर्सचा भाग असणार आहे. ज्यात हृतिक रोशन ज्युनियर एनटीआर सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. त्यसोबतंच जर ‘फायटर ‘ चित्रपटाबद्दल बोलायचं तर या चित्रपटात,हृतिक रोशनसोबत दीपिका पदुकोन आणि अनिल कपूर देखील आहेत. पाच दिवसात या फिल्मने डोमेस्टीक बाॅक्स ऑफिसवर 126.50 करोड रुपयांची कमाई केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

छोट्या पडद्यावरील ‘या ‘अभिनेत्री मुकल्या बिगबाॅसच्या विजेतेपदाला, पाहा कोणाचा आहे समावेश
रणदिप हुड्डा वेगळ्या पद्धतीने देणार शहीदांना श्रद्धांजली,शहीद दिवशी रिलीज होणार ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’

हे देखील वाचा