भोजपुरी सिनेमाचा सुपरस्टार गायक गुंजन सिंग आजकाल इंडस्ट्रीवर वर्चस्व गाजवत आहे. त्याची एकापाठोपाठ एक अशी अनेक गाणी रिलीझ होत आहेत, जी भोजपुरी प्रेक्षकांना वेड लावत आहेत. गुंजन सिंग त्याच्या गाण्यांसोबतच त्याच्या स्टाईलसाठीही ओळखला जातो. त्याची गाणी दमदार असतात आणि त्यात खूप मजाही दाखवली जाते. गुंजन सिंगचे असेच एक गाणे नुकतेच रिलीझ झाले आहे, जे बरेच चर्चेत आहे.
बुधवारी (१४ एप्रिल) गुंजन सिंगचे ‘बंगलिनिया बिया’ हे गाणे व्हेव म्युझिकच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून रिलीझ करण्यात आले होते. गाण्याला प्रेक्षकांकडून खूप पसंत केले जात आहे. रिलीझच्या पहिल्याच दिवशी गाण्याने एक लाख व्ह्यूजचा टप्पा पार केला होता. आतापर्यंत या गाण्याला २६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
गुंजन सिंगच्या या गाण्याचे वैशिष्ट्य स्वत: गुंजन सिंग आहे. पण त्याशिवाय अभिनेत्री महिमा सिंगने या गाण्यात जो बोल्डनेसचा तडका लावला आहे, तो अगदी पाहण्यासारखा आहे. ही अभिनेत्री तिच्या स्टाईलने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावत आहे. गाण्यात गुंजन सिंगसोबत तिची अप्रतिम केमिस्ट्री पाहायला मिळाली. यामुळेच हे गाणे सतत पाहिले जात आहे.
गुंजन सिंगचे सुपरहिट गाणे ‘बंगलिनिया बिया’ला स्वतः गुंजनने आपला आवाज दिला आहे आणि त्याला साथ दिली आहे प्रसिद्ध भोजपुरी गायिका अंतरा सिंग प्रियांकाने. अलीकडेच अंतराची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. गुंजनचे हे गाणे यादव राज यांनी लिहिले आहे, तर शुभम राजने गाण्याला संगीत दिले आहे. गाण्याचे व्हिडिओ संचालक आर्यन देव आहेत, तर संपादक सोनू पांडे आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘रजऊ के पढ़ाईब’ नंतर प्रमोद प्रेमीच्या ‘चईत के टेम्परेचर’ गाण्यानेही गाठला मोठ्या व्ह्यूजचा टप्पा!
-कमालच! भोजपुरी स्टार ऋचा दीक्षित आणि प्रवेश लालने केला ‘काली नागिन के जैसी…’ गाण्यावर रोमान्स
-खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! पार केला २८ लाख व्ह्यूजचा टप्पा