कडाक्याच्या थंडीमध्ये भररस्त्यात ‘लिप-लॉक’ करताना दिसलं ‘हे’ स्टार कपल, रोमँटिक फोटो व्हायरल


टेलिव्हिजनवर राम आणि सीतेची भूमिका साकारणारे गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि देबिना बॅनर्जी (Debina Banarjee) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. हे स्टार कपल सध्या ख्रिसमससाठी लंडनला गेले आहेत. तिथून हे दोघे सतत एन्जॉय करतानाचे फोटो शेअर करत आहे. अशातच या स्टार कपलचा अतिशय रोमँटिक फोटो समोर आला आहे. खरं तर गुरमीत आणि देबिनाचा लिपलॉकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भररस्त्यात केलं लिप-लॉक
देबिना आणि गुरमीत दोघेही लंडनच्या रस्त्याच्या मधोमध लिप-लॉक करताना दिसले. या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये दोघांनेही लोकरीचे कपडे घातले आहेत आणि एकमेकांना लिपलॉक करताना दिसत आहेत. (Gurmeet Choudhary and Debina Banarjee lip lock photo viral)

स्वतः शेअर केला फोटो
हा रोमँटिक फोटो स्वतः गुरमीत चौधरीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “तू माझ्या बाजूला… एकत्र मिळूनच हे करू शकतो.” यासोबतच गुरमीत आणि देबिनाने अनेक एकत्र फोटो शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये हे दोन स्टार्स एकमेकांचा हात धरताना दिसले, तर काही फोटोंमध्ये ते एकमेकांकडे प्रेमाने बघत होते.

टीव्हीवर साकारलीय राम-सीताची भूमिका
गुरमीत आणि देबिना हे टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध स्टार कपल्सपैकी एक आहेत. या दोघांना ‘रामायण’ या मालिकेतून ओळख मिळाली. ही मालिका २००८ मध्ये आली होती. या शोमध्ये या दोन्ही स्टार्सनी ऑन कॅमेरा राम आणि सीतेची भूमिका साकारली होती. त्यानंतर सर्वजण त्यांना ओळखू लागले. यानंतर हे दोन्ही स्टार्स अनेक मालिकांमध्ये दिसले, मात्र इतक्या वर्षांनंतरही हे दोघेही राम आणि सीतेच्या भूमिकेसाठीच अधिक ओळखले जातात.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!