Saturday, May 23, 2026
Home अन्य दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांची बहीण असलेल्या ललिता लाजमी यांचे निधन

दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांची बहीण असलेल्या ललिता लाजमी यांचे निधन

दिवंगत प्रतिभावान अभिनेते आणि उत्कृष्ट दिग्दर्शक असणाऱ्या गुरुदत्त यांच्या बहिणीचे ललिता लाजमी यांचे दुःखद निधन झाले आहे. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी ललिता लाजमी यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती जहांगीर निकोल्सन आर्ट फाउंडेशन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ललिता लाजमी यांनी आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या सिनेमात एक छोटी भूमिका देखील साकारली होती.

ललिता लाजमी यांच्या निधनाबद्दल वृत्त देताना जहांगीर निकोल्सन आर्ट फाउंडेशनने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “आम्हाला ही बातमी सांगताना अतीव दुःख होत आहे की, ललिता लाजमी यांचे दुःखद निधन झाले आहे. त्या स्वतःच स्वतःच्या प्रेरणेने कलाकार झाल्या होत्या. त्यांना शास्त्रीय नृत्याची प्रचंड आवड होती. त्यांनी त्यांचे आयुष्य अतिशय उत्तम पद्धतीने जगले. ललिता लाजमी यांनी खूप काम केले. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.” या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्यांना कलाकार, फॅन्स आदींसोबतच इतर विविध क्षेत्रातील दिग्गज लोकांनी श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केले आहे.

लेखक यासिर उस्मान यांनी त्यांचे पुस्तक असणाऱ्या ‘गुरुदत्त: एन अनफिनिश्ड स्टोरी’ यात ललिता लाजमी यांच्याबद्दल लिहिले होते. त्यांनी लिहिले की, ललिता लाजमी यांना नेहमीच एक दुःख होते की त्या त्यांच्या भावाची कोणतीही मदत करू शकल्या नाही. यासिर यांनी सांगितले होते की, “मी जेव्हा या पुस्तकासाठी रिसर्च करत होतो तेव्हा ललिता लाजमी यांनी मला सांगितले होते की, त्या त्यांच्या भावाला वाचू शकल्या नाही. तो मदत मागत होता, मात्र तो माझ्याशी बोलत नव्हता. यामुळेच हेच त्यांच्या जीवनातील सर्वात मोठे दुःख बनले होते.” तत्पूर्वी ललिता लाजमी यांच्या चित्रांची अनेक प्रदर्शनं भरली जायची. त्यांच्या या कलेला सर्वांकडूनच भरपूर दाद मिळायची.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष

पीएम माेदींनी साऊथ कलाकारांची घेतली भेट; म्हणाले, ‘महिलांच्या सहभागाला…’

हे देखील वाचा