Monday, April 15, 2024

Munawar Faruqui-Hina Khan : पावसात रोमँटिक झाले मुनव्वर- हिना; ‘हल्की हल्की सी’ गाणं रिलीज

टीव्हीचा सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस 17’चा विजेता आणि वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी(Munawar Faruqui) हा सध्या खूप चर्चेत आहे. नुकतचं मुनव्वरचं नवं गाणं रिलीज झाले आहे. टीव्ही अभिनेत्री हिना खानसोबत (Hina Khan)मुनव्वर रोमन्स करताना दिसला आहे. त्यांचे हे गाणं इतक लोकप्रिय झांल की काही तासांत युट्युबवर त्याचे व्ह्युज लाखाच्या वर गेले आहेत.

काही दिवसांपूर्वी मुनव्वर(Munawar Faruqui) आणि हिनाच्या ‘हल्की हल्की सी’ गाण्याचा टीझर लाँच झाला होता. त्यानंतर गेल्या काही दिवासांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता संपुर्ण अल्बम लाँच झाला आहे.

मुनव्वर (Munawar Faruqui) आणि हिना खान (Hina Khan) यांनी हे गाणे कोलकातामध्ये शूट केले आहे. गाण्याची थीम बंगाली मुलगी आणि मुलाची प्रेमकथा आहे. या गाण्याची सुरुवात मुनव्वर आणि हिनाच्या लहानपणापासून झालेली दिसते. दोघेही लहानपणीच विभक्त होतात आणि नंतर मोठे झाल्यावर पुन्हा एकदा भेटतात.

हे गाणे अनीस कौर आणि साज भट्ट यांनी गायलं आहे. या गाण्याचे बोल संजीव चतुर्वेदी यांनी लिहिले असून त्यांनी संगीत देखील दिलंय. हा म्युझिक व्हिडिओ अ ट्रू मेकर्स फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. हे गाणं प्लेडीएमएफच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर रिलीज झाले आहे.

मुनव्वरचे (Munawar Faruqui) यापूर्वी हिना खानबरोबरचे (Hina Khan)फोटो व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांबरोबर सेटवर मजा करताना दिसले होते. त्यांचे हे फोटो चाहतांना खूप आवडले होते.

दरम्यान बिग बॉस’ शोदरम्यान मुनव्वरच्या चाहत्यांनी त्याला खूप पाठिंबा दिला होता. हा शो जिंकल्यानंतर त्यानं चाहत्यांचं खूप आभार मानले होते. ‘बिग बॉस 17’पूर्वी मुनव्वर फारुकीनं कंगना राणौतचा रिॲलिटी शो ‘लॉक अप’चा ताजही जिंकला आहे. तर हिना खान ही हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील अक्षरा हे तिचं पात्र प्रचंड लोकप्रिय झालं होतं.

हेही वाचा:

Shaitaan : ‘शैतानचा परिणाम माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर, पत्नीच्या स्वभावात बदल’, आर माधवनचा खुलासा

‘द क्रू’ मधील करीना-तब्बू आणि क्रितीचा लूक समोर, एअर होस्टेसच्या वेशभूषेत अभिनेत्रींनीं जिंकले मन

हे देखील वाचा