टोलिव्हिजन वरील प्रसिद्ध मालिका ‘गुम है किसी के प्यार मे‘ या मालिकेतील खलनायक भूमिका स्वीकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा आज आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. या मालिकेतील तिचे ‘पाखी’ नावाचे पात्र खूपच प्रसिद्ध असून तिला अमाप प्रसिद्धी देखिल मिळाली आहे. ती मालिकेमध्ये भले विराटची म्हणजेच अभिनेता नील भट्ट याच्या वहिणीची भूमिका पार पाडत आहे मात्र, खऱ्या आयुष्यामध्ये हे दोघे नवारा बायको आहेत. याच मालिकेच्या सेटवर दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली आणि गोष्ट थेट लग्नापर्यतच पोहोचली. चला तर अभिनेत्रीच्या या खास दिवशी तिच्या आयुष्यामधील काही रंजक गोष्टी जाणून घेऊया
अभिनेता नील भट्ट (Neel Bhatt) आणि ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) यांची पहिली भेट ‘गुम है किसी के प्यार में’ (Gum Hai Kiseke Pyar Me) या मालिकेच्या सेटवर झाली होती. काम करता करता दोघांची चांगली मैत्रीच झाली आणि मैत्रिचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. दोघेहे एकमेकांसोबत एवढे वेळ घालवाचे की, त्यांना समजलेच नाही की, ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत.
नील आणि ऐश्वर्याची भेट सप्टेंबरमध्ये झाली आणि ऑक्टोंबरमध्ये त्यांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झाली, आणि दोघांनीही एकमेकांना आपल्या मनातली गोष्ट सांगितली. मात्र, सेटवर यांच्याबद्दल कोणालाच शंका देखिल आली नाही. काही दिवसानंतर दोघांनीही लवकरच लग्नगाठ बांधली आहे. दोघांच्या नात्याबद्दल समजल्या नंतर सगळेच आनंदासोबत आश्चर्यचकितही होते.
ऐश्वर्या आणि नील यांच्यासोबतच कुटुंबीय देखिल खूपच खुश होते, त्यामुळे नीलला जास्त कष्ट घेण्याची गरज पडली नाही. 2021 मध्ये (दि, 11 डिसेंबर) रोजी त्यांनी मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा संपन्न केला. यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यासोबतच बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री रेखा (Rekha) यांनी देखिल लग्नामध्ये आगमन केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रियांका चोप्राने उघड केले बॉलिवूडचे कटू सत्य; म्हणाली, ‘काळी मांजर म्हणायचे…’
सुशांत सिंगनंतर ‘या’ अभिनेत्रीच्या भावाला डेट करतेय रिया चक्रवर्ती