तीन लग्न करूनही हॉलिवूडची सौंदर्यवती आज आहे एकटी; वयाच्या १४ व्या वर्षी केली होती मॉडेलिंगला सुरुवात


हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एंजेलिना जोलीने शुक्रवारी (४ जून) तिचा ४६ वा वाढदिवस साजरा केला. सौंदर्याने, अभिनयाने आणि बोल्डनेसमुळे ओळखल्या जाणाऱ्या एंजेलिनाचे जगभरात करोडो चाहते आहेत. लॉस एंजेलिसमध्ये एंजेलिनाचा जन्म झाला होता. एंजेलिना तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत आली. तिचे वैयक्तिक आयुष्य हे जणू सार्वजनिक चर्चेचा विषयच ठरला होता.

एंजेलिना जेव्हा एक वर्षाची होती, तेव्हाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. तिचा आणि तिच्या भावाचा सांभाळ तिच्या आईने केला. वयाच्या १४ व्या वर्षी तिने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तिने १९८२ साली तिच्या वडिलांच्या जॉन वोइट यांच्या ‘लुकिंग टू गेट आउट’ या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी तिने ‘साइबोर्ग-2’ या सिनेमाद्वारे चित्रपटांमध्ये काम केले. लहान असताना एंजेलिनाला फनरल डायरेक्टर व्हायचे होते. फनरल डायरेक्टर म्हणजे मृतदेहांची देखभाल करणारी व्यक्ती. मात्र, नशिबाने तिला या ग्लॅमर जगात आणले आणि या इंडस्ट्रीतला मोठा स्टार बनवले.

एंजेलिनाने तिच्या आयुष्यात तीन लग्न केले. तिच्या पहिल्या लग्नात तिने काळ्या रंगाची पँट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता आणि शर्टवर रक्ताने जॉनी मिलरचे (तिच्या पहिल्या पतीचे नाव) नाव लिहिले होते. तिला अशा वेशात पाहून उपस्थित असलेले सर्वच चकित झाले होते.

एंजेलिना ‘पुशिंग टिन’ चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान अमेरिकन अभिनेता बिली बॉब थार्नटनला भेटली आणि २००० साली या दोघांनी लग्न केले. अतिशय विचित्र कारणांमुळे हे दोघे माध्यमांमध्ये राहायचे. हे दोघे एकमेकांच्या रक्ताच्या छोट्या बाटल्या गळ्यात टाकून फिरायचे. मात्र, २००३ साली ते वेगळे झाले.

तिच्या आयुष्यात येणारा तिसरा व्यक्ती म्हणजे अभिनेता ब्रॅड पिट. हे दोघं ७ वर्ष लिव्ह इन मध्ये राहिले आणि २०१४ साली त्यांनी लग्न केले. मात्र, यांचे लग्न देखील जास्त काळ टिकले नाही. या दोघांना ३ मुले झाली असून तीन मुलं एंजेलिनाने दत्तक घेतली आहेत. आता ती एकटीच आहे.

एंजेलिनाने वयाच्या २० वर्षापर्यंत सर्व प्रकारच्या ड्रग्सचे सेवन केले होते. ती ड्रग्सची शिकार झाली. मात्र, तिच्या पहिल्या पतीने तिला या नशेतून बाहेर पडला मदत केली. आज एंजेलिनाने जे स्टारडम मिळवले आहेत ते मिळवणे देखील चांगल्या चांगल्या लोकांसाठी कठीण आहे.

एंजेलिनाने तिच्या करियरमध्ये ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’, ‘स्क्रीन एक्टर्स गिल्ड अवार्ड्स’ आणि ‘अकादमी’ पुरस्कारांवर नाव कोरले आहे. एंजेलिना डिप्रेशनची शिकार सुद्धा झाली होती. आता मात्र ती या सर्वातून बाहेर आली असून तिचे जीवन आनंदाने जगत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.