अक्षय कुमार हा एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. तर तो त्याच्या उत्तम चित्रपटामुळे नेहमीच चर्चेत असतो. तर तो सध्या त्याच्या एका नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच आगामी चित्रपट ‘भूत बंगला’ हा लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यातील गाण्यानी चित्रपट रीलीज पुर्वीच धुमाकुळ घातला आहे. त्यातील गाण्यांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. अक्षय कुमार अभिनीत ‘भूत बंगला हा चित्रपट हॉरर कॉमेडी शैलितील चित्रपट आहे. ‘भूत बंगला’ला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) हिरवा कंदील मिळाला आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला U/A 16+ प्रमाणपत्र दिले आहे, याचा अर्थ 16 वर्षांखालील मुले हा चित्रपट फक्त त्यांच्या पालकांसोबत पाहू शकतात.
‘भूत बंगला’या चित्रपटाच्या निर्मात्यांकडे प्रमाणपत्र जारी करण्यापूर्वी, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात काही बदल करण्याची विनंती केली होती. जे बदल करण्यास निर्मात्यांनी सहमती दर्शवली. सेन्सॉर बोर्डाने ‘भूत (Bhoot)बंगला’च्या निर्मात्यांना चित्रपटात काही बदल करण्याचे आदेश दिले. CBFC ने त्यांना चित्रपटात वापरलेली काही शिवीगाळ, अश्लील भाषा बदलण्याचे किंवा काढून टाकण्याचे निर्देश दिले. बोर्डाने महिलांविषयीच्या एका अपमानजनक टिप्पणीवरही आक्षेप घेतला होता. आणि त्यात बदल करण्याचे आदेश दिले. चित्रपटातील धार्मिक विषय किंवा अंधश्रद्धा असलेल्या सर्व दृश्यांना एक अस्वीकरण देखील जोडण्यात आले.
बॉलिवूडच्या एका अहवालानुसार, बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही निर्मात्यांना काही दृश्ये काढून टाकण्यास सांगण्यात आले. केवळ एक-दोन नव्हे, तर चित्रपटातून एकूण 63 दृश्ये काढून टाकण्यात आली. आणि नियमाचे पालन करत निरमात्यांना सर्व बदल स्वीकारले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा


