…आणि आपल्या होणाऱ्या पत्नीला वधू वेशात पाहताच पाणावले होते अनिल कपूरचे डोळे


अनिल कपूर हे बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेते आहेत. आज ते आपला ६४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ६४वा वाढदिवस साजरा करत असलेल्या अनिल कपूर यांचा कामाबद्दलचा उत्साह आणि एनर्जी तरूणांदेखील लाजवेल अशीच आहे.

कपूर यांनी १९७९ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांनी बॉलिवूडमध्ये जम बसवायच्या आधीच १९८४ मध्ये लग्न केले. त्यांच्या पत्नीचे नाव सुनीता कपूर.  अनिल कपूर आणि सुनीता यांनी लग्नाआधी काही वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर १९८४ ला त्यांनी लग्न केले.

अनिल कपूर आणि सुनीता यांच्या लग्नाला ३६ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने अनिल कपूर यांनी त्यांच्या लग्नाबद्दल काही गोष्टी उघड केल्या होत्या.

त्यांनी एक पोस्ट करत लिहिले होते की, ‘१९ मे १९८४ हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस आहे. मी सुनीताला प्रपोज करत तिला लग्नाची मागणी घातली. आमचे लग्न बरेच दिवस टाळले जात होते. मला सुनीताची चांगली काळजी घ्यायची होती. तिचा हक्काचे चांगले जीवन मला तिला द्यायचे होते. मला कमीत कमी तिच्यासाठी एक घर घ्यायचे होते, घरी कूक ठेवायचा होता. मात्र अनेक अडचणींवर मात करत आमचे लग्न ठरले.”

“मी जेव्हा लग्नाच्या दिवशी सुनीताच्या घरी गेलो तेव्हा सुनीता वधूच्या वेशात होती. मला बघून हसत होती. मी मात्र तिला बघितले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आनंद आणि नव्हर्सनेसमुळे माझ्या डोळ्यातून पाणी येत होते. आमचे लग्न फक्त एका दिवसाच्या तयारीवर झाले. ना आमचे लग्न मोठे होते, ना ही आम्ही लग्नानंतर हनिमूनला गेलो. आज इतक्या वर्षांनी देखील सुनीता मला या गोष्टींवरून चिडवत असते. आमच्या लग्नानंतर खूप लोकांनी अशी भविष्यवाणी केली होती की, लवकर लग्न केल्यामुळे माझे करियर नक्कीच खराब होईल. मात्र मी आज निश्चितपणे सांगू शकतो तेव्हा मला तुझ्याशिवाय एक दिवसही वाया घालवायचा नव्हता,” असेही ते त्या पोस्टमध्ये म्हणाले होते.

अनिल कपूर आणि सुनीता दोघांनी ३६ वर्ष सुखाचा संसार केला. त्यांच्या लग्नानंतर काही वर्षांनी अनिल यांना यश मिळायला सुरुवात झाली. तोपर्यंत अनिल कपूरचा सर्व खर्च सुनीता करायची. सुनीताने लग्नानंतर तिचे करियर सोडून दिले आणि फक्त घरावर आणि मुलांवर लक्ष दिले.


Leave A Reply

Your email address will not be published.