बर्थडे स्पेशल! ‘अर्थ’पासून ते ‘सरफरोश’पर्यंत जगजीत सिंग यांच्या आवाजाने ‘हे’ चित्रपट ठरले हिट

मखमली आवाजाचे राजे जगजीत सिंग यांनी कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात 1966 च्या ‘बहुरूपी’ चित्रपटात ‘लागी राम भजन नी लगनी’ या गाण्याला आपला आवाज दिला होता. त्यानंतर त्यांनी राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर अभिनित चित्रपट ‘आविष्कार’ मध्ये ‘बाबुल मोरे नैहर’ गाण्याला आपला उत्तम आवाज दिला. सुरुवातीच्या काही बॉलिवूड चित्रपटांनंतरच 1981 मध्ये जगजीतच्या आवाजाची जादू बाहेर आली आणि त्यांचे ‘होठों से छू लो तुम’ हे गाणे जबरदस्त ठरले. लोकांना ‘प्रेमगीत’ या चित्रपटाची कहाणी कदाचित आठवत नसली, तरीही हे गाणे सर्वांच्याच जिभेवर असते. प्रेमगीतव्यतिरिक्त जगजितने आपल्या मधूर आवाजाने कोणते चित्रपट बनवले गुलजार?, जाणून घेऊयात या लेखामध्ये.

अर्थ (1982)
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो…
‘प्रेमगीत’ चित्रपटातील ‘होठों से छू लो तुम’ नंतर जगजीतला ‘अर्थ’ हा चित्रपट मिळाला. सन 1982 च्या या चित्रपटात जगजीतने एक-दोन नव्हे, तर एकूण पाच गाणी गायली. यामध्ये ‘झुकी-झुकी सी नजर’, ‘कोई ये कैसे बताए’, ‘तेरी खुशबू में बसे’, ‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो’ या गाण्यांचा समावेश आहे. कैफी आझमीचे ‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो’ हे गाणे फारच चांगले गाजले आणि काही दिवसांतच हे गाणे लोकांचे आवडते गाणे ठरले. जगजीत व्यतिरिक्त त्यांची पत्नी चित्रा यांनी देखील या चित्रपटाच्या ‘तू नहीं तो जिंदगी में’ गाण्याला आपला आवाज दिला होता.

साथ- साथ (1982)
तुमको देखा तो ये ख्याल आया…
सन 1982चा चित्रपट ‘साथ साथ’ हा जगजीतच्या ‘तुमको देखा तो ये ख्याल आया’ या गाण्यामुळे चर्चेत आला होता. हे गाणे फारूक शेख आणि दीप्ती नवल यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते, ज्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. या लोकप्रिय गाण्यासोबतच त्यांनी ‘ये बता दे मुझे जिंदगी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘प्यार मुझसे किया तुमने तो क्या पाओगे’ या आणखी चार गाण्यांना आवाज दिला. चित्रपटाच्या सर्वच गाण्यांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शविली होती.

खलनायक (1993)
ओ मां तुझे सलाम….
सन 1993 मध्ये रिलीज झालेला ‘खलनायक’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाच्या ‘ओ मां तुझे सलाम’ या गाण्याला जगजीतसिंगने आवाज दिला आहे. हे गाणे जॅकी श्रॉफ आणि राखीवर चित्रीत करण्यात आले होते.

दुश्मन (1998)
चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन से देस…
सन 1998 साली आलेला ‘दुश्मन’ चित्रपट चांगलाच गाजला होता. चित्रपटासह त्याची गाणीही चांगलीच गाजली होती. चित्रपटाच्या ‘चिट्ठी ना कोई संदेश’ या गाण्याने प्रेक्षकांना भावनिक करून टाकले. हे गाणे काजोलवर चित्रीत करण्यात आले होते. चित्रपटातील ‘आवाज दो हमको’ आणि ‘प्यार को हो जाने दो’ हे गाणे देखील बरेच गाजले. तसेच, ही गाणी लता मंगेशकर, उदित नारायण आणि कुमार सानू यांनी गायली आहेत.

सरफरोश (1999)
होश वालों को खबर क्या…
आमिर खान, सोनाली बेंद्रे आणि नसीरुद्दीन शाह अभिनित चित्रपट ‘सरफरोश’ मधील ‘होश वालों को खबर क्या’ ही गझल अनेक वर्षांनंतरही लोकांच्या आवडत्या गझलपैकी एक आहे. ही गझल नसीरुद्दीन शाह, आमिर आणि सोनालीवर चित्रीत करण्यात आली होती.

तरकीब (2000)
किसका चेहरा अब मैं देखूं…
तब्बू, मिलिंद सोमन, नाना पाटेकर, शिल्पा शेट्टी, आदित्य पंचोली आणि आशुतोष राणा अभिनीत ‘तरकीब’ चित्रपटातील ‘किसका चेहरा अब मैं देखूं’ हे गाणे आजही सर्वांच्या तोंडी असते. या गाण्याला जगजित सिंग आणि अलका याग्निक यांनी आपला मधुर आवाज दिला होता. ‘तरकीब’ क्राईम ड्रामा फिल्म प्रेक्षकांना प्रभावित करण्यास अपयशी ठरली असली, तरीही या गाण्यामुळे चित्रपटाला बरीच ओळख मिळाली.

तुम बिन (2001)
कोई फरियाद…
सन 2001 मध्ये रिलीज झालेल्या ‘तुम बिन’ चित्रपटाच्या ‘कोई फरियाद’ हे गाणे प्रेक्षकांना खूपच भावले. जगजीत सिंगांच्या आवाजाने गायलेले हे गाणे प्रत्येकाची पहिली पसंती असून, आतापर्यंत या गाण्याचे अनेक रिमिक्स बनले आहेत.

हे गाणे आजही अनेकांच्या मुखात असते.

हेही वाचा-

प्रेयसीने आपल्याशी लग्न करावे म्हणून जगजीत सिंग यांनी तिच्या नवऱ्यालाच करायला लावली होती मध्यस्थी

Leave A Reply

Your email address will not be published.