Sunday, June 23, 2024

पुण्यात साधी नोकरी करणारा युवक कसा झाला सर्वांचा चहिता ‘देवमाणूस’; नकारात्मक पात्र असूनही करतोय प्रेक्षकांच्या मनावर राज्य

आजकाल ‘देवमाणूस’ ही मालिका बरीच चर्चेत आहे. यातील कलाकारांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. यातले मुख्य आणि महत्त्वाचे पात्र अभिनेता किरण गायकवाड साकारत आहे. त्याच्या डॉ. अजितकुमार देव या पात्राला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे.

‘देवमाणूस’ मधील त्याच्या पात्रामुळे तो सध्या खूप चर्चेत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, एक साधी नोकरी करणारा युवक आज सर्वांचा चहिता कसा झाला? आज म्हणजेच १२ जूनला अभिनेता त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. तर या खास दिनी आपण किरण गायकवाडचा अभिनयप्रवास पाहूयात.

किरण मूळचा पुण्याचा. त्याचा जन्म १२ जून रोजी पुण्यात झाला आणि त्याचे पूर्ण बालपणही पुण्यातच गेले. पुण्यातील यशवंतराव मोहिते महाविद्यालयातून त्याने त्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याला अगोदर पासूनच अभिनयात रस होता. कॉलेजमध्ये शिकत असताना देखील किरण बऱ्याच नाटकांमध्ये भाग घ्यायचा.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी किरण महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्यांनतर तो आजारी पडला आणि आजारी असल्याकारणाने त्याने ती नोकरी सोडून दिली. पुढे तो त्याच्या अभिनयाच्या आवडीकडे लक्ष देऊ लागला आणि नाटकापासून सुरुवात केली. त्यासाठी तो एका नाटक ग्रुपमध्ये काम करू लागला.

पुढे २०१७ साली किरणला ‘लागीर झालं जी’ मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्याने याच संधीचं सोनं केलं आणि आपलं नाव कमावलं. या मालिकेत किरणने ‘भैयासाहेब’ ही सहाय्यक भूमिका साकारली होती, जी खूप गाजली. सहाय्यक पात्र असूनही त्याला मुख्य नायका इतकीच लोकप्रियता आणि प्रेम मिळालं.

या मालिकेत त्याचे काम पाहिल्यानंतर, त्याला ‘देवमाणूस’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत, किरणने चाहत्यांना मनावर आपल्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली. ‘देवमाणूस’मध्ये नकारात्मक भूमिका असूनही चाहत्यांकडून किरणला भरभरून प्रेम मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेग्नंसीच्या वृत्तांमध्ये समोर आला अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा पहिला फोटो; ६ महिने गरोदर असल्याचा दावा

-‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; नेहमीप्रमाणेच सायरा बानो यांची होती त्यांना साथ

-‘मीच माझ्या स्वप्नातली स्त्री!’, भाग्यश्री मोटेच्या हॉट ऍंड ब्यूटीफुल फोटोसोबतच लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत

हे देखील वाचा