Saturday, April 20, 2024

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : ‘हे’ दोन अभिनेते ठरले सर्वोत्कृष्ठ, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज (शुक्रवार, 22 जुलै) रोजी करण्यात आली. हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना या पुरस्कारांसाठी नामांकने दिली जातात. यंदा 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पाच वेगवेगळ्या विभागात हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिले जातात. चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारांची सुरुवात 1954 साली करण्यात आली होती. त्यावेळी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘शामची आई’ या मराठी चित्रपटाला देण्यात आला होता.

68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या पुरस्कार्थ्यांची नावे ;

1. सर्वोत्कृष्ट अभिनेता – अजय देवगण (तान्हाजी), सूर्या (सोरारई पोटरु)
2. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – तुलसीदास (आशुतोष गोवारीकर)
3. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट, तानाजी : द अनसंग वॉरियर, निर्माता- अजय देवगण, दिग्दर्शक- ओम राऊत
4. सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म – सोरारई पोरु (तामिळ)
5. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अपर्णा बालमुरली (सोरारई पोटरु)
6. सर्वोत्कृष्ट गीतकार – मनोज मुन्तशिर (सायना)
7. सर्वोत्कृष्ट बुक ऑन सिनेमा – द लॉन्गेस्ट किस – लेखक किश्वर देसाई
8. सर्वोत्कृष्ट म्युझिक डायरेक्शन – विशाल भारद्वाज (1232 किलोमीटर)
9. विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म
– जून (मराठी), अभिनेता – सिदार्थ मेनन
– गोदाकाठ (मराठी) आणि अवांचित (मराठी), अभिनेता- किशोर कदम
10. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, गोष्ट एका पैठणीची दिग्दर्शक – शांतनू रोडे
11. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, राहुल देशपांडे, चित्रपट – मी वसंतराव
12. सर्वोत्कृष्ट बालकलाकार (मराठी चित्रपट) अनिश गोसावी, चित्रपट- टकटक आणि आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर, चित्रपट- सुमी
13. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट, फनरल (मराठी), विवेक दुबे
14. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : सुमी, दिग्दर्शक – अमोल गोळे

( 68th National Film Awards Bollywood Actor Ajay Devgn and Tollywood Suriya share Best Actor Award )

अधिक वाचा –
मोठी बातमी! सलमान खानला हवीये बंदूक, पोलिसांकडे केली मागणी, वाचा सविस्तर
ब्रेकिंग! राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची छाप, पाहा कुणाकुणाला मिळालाय पुरस्कार

हे देखील वाचा