Friday, July 26, 2024

जेव्हा भले भले सुपरस्टार लपत होते मागे, केवळ प्रीती झिंटाने अंडरवर्ल्ड डॉनविरूद्ध दिली होती साक्ष

‘डिंपल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रीती झिंटाने (Preity Zinta) तिच्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. चित्रपटाच्या पडद्यावर प्रीतीने बऱ्याच धाडसी महिलांची भूमिका साकारली आहे, परंतु खऱ्या आयुष्यातही ती खूप धाडसी आहे हे फार कमी लोकांना माहित असेल. मंगळवारी (31 जानेवारी) प्रीती तिचा 48वा वाढदिवस साजरा करत आहे आणि या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला तिच्या शौर्याशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत.

साल २००१मध्ये ‘चोरी-चोरी चुपके-चुपके’ हा चित्रपट चर्चेत आला होता. अब्बास मस्तान हा चित्रपट बनवत होते आणि प्रीती झिंटा, राणी मुखर्जी (Rani Mukerji) आणि सलमान खान (Salman Khan) या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. तेव्हा आलेल्या काही बातम्यांनुसार, चित्रपट निर्मितीसाठी दिग्दर्शकाने नव्हे तर अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याने पैसे लावले होते. परंतु कागदावर असे होते की, चित्रपट निर्मितीसाठी हिऱ्याचे उद्योगपती भरत शाह आणि निर्माता नाझिम रिझवी यांनी पैसे लावले आहेत. (happy birthday preity zinta when actress testifying against underworld don know full story)

या गोष्टीचा सुगावा पोलिसांना लागला आणि तपासादरम्यान अब्बास मस्तानच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘चोरी-चोरी चुपके-चुपके’ या चित्रपटाचे सर्व प्रिंट पोलिसांनी सील केले. या प्रकरणात शाहरुख खान (Shahrukh Khan), सलमान खान आणि राणी मुखर्जी यांनाही धमकीचे कॉल येत होते. धमकावल्याची तक्रार नोंदविण्यासाठी हे कलाकार पोलीसांपर्यंत पोहोचले. पण जेव्हा पोलिसांनी त्यांना कोर्टात हे बोलण्यास सांगितले तेव्हा त्या सर्वांनी माघार घेतली.

अशा गंभीर प्रकरणात जेव्हा सर्व सुपरस्टार्स माघार घेत होते, तेव्हा केवळ प्रीती झिंटा ही अभिनेत्री होती जी कोर्टात साक्ष देण्यासाठी आली होती. प्रीती झिंटाने कोर्टाला सांगितले की, तिला धमकीचे कॉल येत आहेत आणि ते लोक पैशाची मागणीही करीत आहेत. हे प्रकरण अंडरवर्ल्डशी संबंधित होते, म्हणून तिचे विधान कॅमेर्‍यात रेकॉर्ड केले गेले. या विधानाच्या आधारे भरत शहाला अटक करण्यात आली होती, तर निर्माता नाजिम रिझवी यांनाही या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले होते.

अभिनेत्री प्रीती झिंटाच्या धाडसीपणाने चित्रपटसृष्टीला हादरवून सोडले होते आणि तिच्या या निर्णयाचे लोकांकडून खूप कौतुक झाले होते.

प्रीतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘वीर-ज़ारा’, ‘कल हो ना हो’, ‘कोई मिल गया’, ‘दिल है तुम्हारा’, ‘सोल्जर’, ‘मिशन कश्मीर’ यासारख्या हिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.(happy birthday preity zinta when actress testifying against underworld don know full story 2)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पडद्यावरची पार्टनर ते आयुष्यभराची अर्धांगिनी, ‘अशी’ होती रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी

‘आई माझ्यासाठी सर्वस्व होती..’, किरण माने यांना आईच्या निधनानंतर केला होता राखी सावंतने फोन

हे देखील वाचा