काय सांगता! शक्ती मोहन नव्हे, तर ‘ही’ आहे राघव जुयालची गर्लफ्रेंड; रोमॅंटिक फोटो आले समोर


लोकप्रिय डान्सर ,रियालिटी शोचा होस्ट राघव जुयाल (Raghav Juyal) याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तो त्याच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतो. परंतु राघव आणि डान्स प्लस(dance Plus)शोमधील शक्ती मोहन (Shakti Mohan) यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. राघव या शोमध्ये शक्तीला नेहमी छेडताना दिसत असतो. सोशल मीडियावर देखील या दोघांच्या चर्चा होत असतात. सर्वांना असे वाटत होते, की हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या जोडीला प्रेक्षक नाहीतर, या शोमधील प्रत्येक जण पसंत करतो. मिळालेल्या माहितीनुसार, राघव जुयाल याची प्रेयसी शक्ती मोहन नसून दुसरीच कोणीतरी आहे. दरम्यान त्याचे त्याच्या प्रेयसीसोबतचे काही फोटो समोर आले आहेत. ते फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

राघव जुयाल विदेशी मुलीला करतोय डेट
राघव जुयाल एका विदेशी मुलीला डेट करत आहे. अलिकडेच या दोघांचे फोटो देखील समोर आले आहेत. त्या फोटोमध्ये ते दोघे एकमेकांसोबत खूप खुश दिसत आहेत. या मुलीचे नाव सारा अर्हूसियस (sara arrhusius) आहे आणि ती स्वीडनमध्ये राहते. सारानेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून राघवसोबतचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे तो आता चांगलाच चर्चेत आला आहे.

२०१८ पासुन करतायेत एकमेकांना डेट
राघव आणि सारा २०१७ मध्ये भेटले होते आणि २०१८ पासून एकमेकांना डेट करत आहेत. सारा आणि राघवच्या  नात्याबद्दल त्यांच्या जवळच्या मित्रांना व कुटुंबाला माहिती आहे. त्याला त्यांच्या नात्याला सीक्रेट ठेवायचे होते, म्हणून त्याने हे नाते जगापासुन लपवून ठेवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सारा आणि राघवची पहिली भेट एका ट्रॅक दरम्यान झाली होती. सारा नेहमीच कामाच्या निमित्ताने भारतामध्ये येत असते. याच दरम्यान ते दोघे एकमेकांसोबत वेळ घालवतात.

राघवने बाळगले मौन
राघव हा एक डान्सर आहे आणि तो अभिनयात देखील सक्रिय आहे. सारा पण चित्रपटांमध्ये काम करते. ती इंटिमेसी को-ऑर्डिनेटर आहे. नेटफ्लिक्सचा प्रसिद्ध शो ‘यंग रॉयल्स’ मध्ये तिने इंटिमेसी को-ऑर्डिनेटरचे काम केले आहे. राघवने त्यांच्या या नात्यावर मौन बाळगले आहे. यामुळेच चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत चालली आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!