Tuesday, June 10, 2025
Home कॅलेंडर B’day Special | अभिनेत्री असूनही रिंकू राजगुरूने कधीच केलं नाही ‘हे’ काम, वाचा तिच्याबद्दल रंजक गोष्टी

B’day Special | अभिनेत्री असूनही रिंकू राजगुरूने कधीच केलं नाही ‘हे’ काम, वाचा तिच्याबद्दल रंजक गोष्टी

अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी आर्ची. सैराट चित्रपटाला येऊन बरेच वर्ष झाली, तरीही रिंकू आजही आर्ची म्हणूनच ओळखली जाते. रिंकूने तिच्या पहिल्याच चित्रपटात तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या अंदाजमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी नाव कोरले आहे. रिंकू नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या नेहमी संपर्कात असते. ती तिचे नवनवीन फोटो, व्हिडिओ, तिच्याशी संबंधित माहिती सतत शेयर करत असते.

मुळची अकलूजची असलेली रिंकू लहानपणापासून अभ्यासात हुशार आहे. आई- वडील दोघेही शिक्षक असल्याकारणाने तिला लहानपणापासूनच वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेेण्याची आवड आहे. शाळेत असताना ती सतत गाणी व नृत्याच्या स्पर्धांमध्ये सामील व्हायची. पण तुम्हाला माहिती आहे का? असे असूनही रिंकूने कधीही नाटक पाहिले नाही. होय, आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावलेल्या रिंकूने, अद्याप नाटकामध्ये सहभागही घेतला नाही आणि ते पाहिलेही नाही.

रिंकूच्या करिअरबद्दल बोलायचे झाले, तर तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटीपेक्षाही जास्त कमाई केली होती. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.

रिंकूने आपला अभिनय मराठी इंडस्ट्रीपुरताच मर्यादित न ठेवता, हिंदी सृष्टीतही काम केले आहे. अभिनेत्रीने ‘अनपॉज्ड’, ‘झुंड’, ‘अनकहीं कहानियॉं’ या हिंदी चित्रपटाच काम केले आहे. खास बाब म्हणजे, ‘झुंड’मध्ये तिने महानायक अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर केली होती. इतकेच नव्हे, तर रिंकू ‘हंड्रेड’ या बेवसिरीजमध्येही झळकली आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर नाव कमावून तिने अनेक पुरस्कारची जिंकले आहेत. तिला ‘सैराट’साठी नॅशनल फिल्म अवॉर्ड, दोन फिल्मफेअर मराठी अवॉर्ड आणि झी सिने अवॉर्ड मिळाले आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर रिंकूच्या खात्यात अनेक प्रोजेक्ट आहेत. आगामी काळात रिंकू ‘छूमंतर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबत, प्रार्थना बेहरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा