सुरुवातीला बालकलाकार म्हणून मिळाली नव्हती ओळख, नाकारली होती तब्बल २ कोटींची जाहिरात, वाचा साई पल्लवीबद्दल रंजक गोष्टी

happy birthday sai pallavi why fidaa star is the best in south film industry


बरेच कलाकार आपल्याला फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करताना दिसतात. मग भलेही ते खऱ्या आयुष्यात या प्रॉडकट्सकडे ढुंकूनही बघत नसतील. अशा परिस्थितीत, एक अभिनेत्री आहे जी अशा फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीला धुडकावून लावल्यामुळे चर्चेत आली होती. ती आहे दक्षिणेची सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी. रविवारी (९ मे) आपला २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या आयुष्यातील रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया…

नाकारली तब्बल २ कोटींची जाहिरात
होय, ‘बिनधास्त गर्ल’ साई पल्लवीने स्किन लाइटनिंग क्रीमची, तब्बल २ कोटींची जाहिरात नाकारली होती. तिच्याकडे भारतीय रंग असल्याचे अभिनेत्रीने म्हटले होते की. तिच्या म्हणण्यानुसार, तिला अशा गोष्टींचे समर्थन करायचे नाही, ज्यामुळे इतर मुली त्यांच्या त्वचेच्या रंगाबाबत स्वतःला कमी लेखतील. अभिनेत्री, खासकरून तिच्या बोलक्या स्वभावासाठी ओळखली जाते. ती अनेकदा विविध सामाजिक विषयांवर मत व्यक्त करताना दिसली आहे.

बालकलाकार म्हणून मिळाली नव्हती ओळख
या अभिनेत्रीने निव्हिन पॉलीसोबत, ‘प्रेमम’ या मल्याळम चित्रपटाद्वारे, दक्षिण सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तसेच, साईने यापूर्वी ‘कसथुरी मा’ आणि ‘धाम धूम’ या तमिळ चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणूनही काम केले होते. मात्र, यातून तिला काही खास ओळख मिळाली नव्हती. आता, अभिनेत्री टॉलिवूड, मॉलिवूड आणि कॉलिवूडमध्ये खूपच सक्रिय आहे.

‘फिदा’द्वारे केलं प्रेक्षकांना प्रभावित
‘प्रेमम’ आणि ‘काली’ या दोन मल्याळम चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, साई पल्लवीने ‘फिदा’ या चित्रपटाद्वारे टॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाने तेलुगु भाषिक प्रेक्षकांना अगदी प्रभावित केले. नंतर तिने ‘दीया’ (तमिळ), ‘मारी’२ (तमिळ), ‘अथिरन’ (मल्याळम), ‘एनजीके’ (तमिळ) इत्यादी लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.

शैक्षणिकरित्या आहे एक डॉक्टर
साई पल्लवी शैक्षणिकरित्या एक डॉक्टर आहे. कारण तिने जॉर्जियाच्या टिबिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून एमबीबीएस (वैद्यकीय पदवी) पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, वैद्यकीय पदवी असूनही, तिने अद्याप स्वत: ला वैद्यकीय प्रॅक्टिशनर (डॉक्टर) म्हणून भारतात नोंदवले नाही. अभिनयाकडे अधिक कल असल्याने, तिने याच क्षेत्रात नाव कमवायचे ठरवले.

आगामी चित्रपट
अभिनेत्रीच्या खात्यात सध्या बरेच तेलुगु प्रकल्प आहेत. ती ‘लव्हस्टोरी’ या आगामी चित्रपटामध्ये नागा चैतन्यसोबत दिसणार आहे. याशिवाय ती राणा दग्गुबती आणि शाम सिंघा रॉय नानीच्या समवेत ‘विराट पर्वम’मध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी भाडे देण्यासाठी नव्हते विजयकडे पैसे, आज आहे करोडो रुपयांचा मालक, ‘या’ कारणामुळे विकला होता पहिला फिल्मफेअर अवॉर्ड

-श्वास रोखून धरा! तब्बल १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री

-Mother’s Day Special: नेहापासून ते नताशापर्यंत लग्नाच्या ९ महिन्यांपूर्वीच आई बनणाऱ्या अभिनेत्री, मलायकाच्या बहिणीचाही समावेश


Leave A Reply

Your email address will not be published.