Wednesday, July 3, 2024

वयाच्या 12व्या वर्षीच सायरा यांना करायचे होते 22 वर्ष मोठ्या अभिनेत्याशी लग्न; रंजक आहे त्यांची ‘लव्हस्टोरी’

बॉलिवूडमध्ये आजच्या काळातच अभिनेत्री परदेशातून येत चित्रपटांमध्ये करियर करतात असे नाही. अगदी पूर्वीच्या काळापासूनच अभिनेत्री परदेशातून भारतात आल्या आहेत आणि त्यांचे करियर केले आहे. मग त्या तिकडच्याच अभिनेत्री असल्या काय किंवा भारतीय असून परदेशात लहानाच्या मोठ्या झाल्या काय. अशा बऱ्याच अभिनेत्रींनी त्यांचे करियर घडवले. अशाच एक अभिनेत्री म्हणजे सायरा बानो. अतिशय सुंदर, प्रतिभासंपन्न अभिनेत्री म्हणून दिग्गज अभिनेत्री सायरा बानो यांचे नाव समोर येते. आज सायरा बानो वयाच्या 78व्या वर्षी त्यांचे सौंदर्य आणि त्यांची चमक अबाधित आहे. सायरा बानो हे नाव उच्चारले की ओघाने दिलीप कुमार हे नाव आधी येतेच. सायरा बानो आणि दिलीप कुमार ही बॉलिवूडमधील सुंदर यशस्वी आणि आदर्श पती पत्नीची जोडी होती. मात्र दुर्दैवाने 7 जुलै 2021 रोजी दिलीप कुमार यांचे निधन झाले आणि ही जोडी कायमची तुटली. बुधवारी (दि. 23 ऑगस्ट) त्या त्यांचा 79वा वाढदिवस साजरा करत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल खास गोष्टी…

सायरा बानो (Saira Banu) यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944 साली भारतात झाला. त्यांची आई नसीम बानो या त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या, तर सायरा यांच्या आजी शमशाद बेगम या दिल्लीमधील प्रसिद्ध गायिका होत्या. नसीम बानो यांनी एहसान मिंया यांच्याशी लग्न केले होते. मात्र जेव्हा भारत पाकिस्तान यांची फाळणी झाली तेव्हा ते पाकिस्तानमध्ये निघून गेले आणि नसीम त्यांच्या मुलांसोबत लंडनमध्ये गेल्या. काही काळाने त्यांचे संपूर्ण कुटुंब पुन्हा भारतात परत आले.

सायरा बानो यांनी वयाच्या 16व्या वर्षी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यांनी शम्मी कपूर यांच्यासोबत ‘जंगली’ सिनेमात काम केले. त्यानंतर त्यांनी ‘आई मिलन की बेला’, ‘ब्लफमास्टर’, ‘पड़ोसन’, ‘पूरब-पश्चिम’, ‘झुक गया आसमान’, ‘आखिरी दांव’, ‘बैराग’, ‘शागीर्द’, ‘अमन’, ‘गोपी’, ‘बलिदान’, ‘आरोप’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी त्यांच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली. त्यांची लोकप्रियता एवढी होती की, त्या 1963 तर 1969 या काळात सर्वात जास्त फी घेणाऱ्या तिसऱ्या अभिनेत्री होत्या, तर 1971 तर 1975 काळात सर्वाधिक फी घेणाऱ्या चौथ्या क्रमांकाच्या अभिनेत्री होत्या.

एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले होते की, त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी दिलीप कुमारांचा ‘आन’ सिनेमा पाहिला आणि त्या दिलीप कुमारांच्या प्रेमात पडल्या. त्या नेहमी म्हणायच्या की मी दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्याशीच लग्न करणार. तेव्हा बालहट्ट समजून सर्व लोकं त्यांचे बोलणे दुर्लक्षित करायचे. मात्र तेव्हा असे वाटले नव्हते की, हा बालहट्ट एकदिवस सत्यात उतरेल.

सायरा यांनी 1969 साली ‘आई मिलन की बेला’ सिनेमात काम केले. त्यांच्यासोबत अभिनेते राजेंद्र कुमार होते. सायरा ह्या राजेंद्र कुमारांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांच्याशी लग्न करायचा हट्ट त्यांनी सुरु केला. मात्र, राजेंद्र कुमार आधीपासूनच विवाहित होते. सायरा यांचा हा हट्ट दूर करण्यासाठी त्यांच्या आईने दिलीप कुमारांना त्यांची समजून घालण्याची विनंती केली. त्यावेळी दिलीप साहेब आणि सायरा हे चांगले मित्र नव्हते तरी देखील दिलीप कुमारांनी त्यांना समजवण्यासाठी होकार दिला.

दिलीप कुमार सायरा बानो याना समजावत असताना सायरा यांनी त्यांना विचारले की, ‘तुम्ही माझ्याशी लग्न कराल का?’ हे ऐकून दिलीप साहेब थक्क झाले. मात्र पुढे त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याच्या निर्णय घेतला. लग्नाच्या वेळी सायरा ह्या २२ वर्षांच्या तर दिलीप कुमार जवळजवळ दुप्पट मोठे म्हणजे 44 वर्षांचे होते. मात्र त्यांच्या प्रेमात वय कधीच आडवे आले नाही. दिलीप कुमार यांचे निधन झाले तेव्हा सायरा बानो त्यांना पकडून खूप रडल्या होत्या.

या दोघांची जोडी, त्यांचे अमर प्रेम हे आजच्या काळातील सर्वच जोडप्यांसाठी एक आदर्श आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
KK Birth Anniversary | अगदी साधेसरळ होते गायकाचे आयुष्य, बालमैत्रिणीशी केला होता विवाह
केकेची एकूण कमाई जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, रोज खेळायचा लाखोंमध्ये

हे देखील वाचा