Saturday, June 15, 2024

नितेश तिवारीच्या ‘रामायण’मधून विजय सेतुपतीचा पत्ता कट, ‘हा’ अभिनेता साकारणार विभीषणची भूमिका!

नितीश तिवारी (Nitish Tiwari) यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा ‘रामायण’ हा आगामी चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ‘ॲनिमल’ स्टार रणबीर कपूर या चित्रपटात रामची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. रणबीर, साई पल्लवी आणि यश हे राम, सीता आणि रावणाच्या मुख्य भूमिकेत आहेत. रावणाचा धाकटा भाऊ विभीषणाची भूमिका साकारण्यासाठी दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीला अप्रोच करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता या व्यक्तिरेखेबाबत नवीन माहिती समोर आलेली आहे.

यापूर्वी अशी बातमी आली होती की, विजय सेतुपती ‘रामायण’ चित्रपटात विभीषणच्या भूमिकेत दिसणार आहेत. परंतु आता माध्यमातील वृत्तानुसार, नितीश आणि विजय यांच्याबाबत चर्चा सुरू होती, ज्यामध्ये विजय रावणाचा भाऊ विभीषणाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. चित्रपटाच्या कथेवर चर्चा करण्यासाठी नितीश तिवारी यांनी नुकतीच विजयसोबत बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आता विभीषणच्या भूमिकेसाठी आणखी एका अभिनेत्याचे नाव समोर येत असून, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

एका नवीन मीडिया रिपोर्टनुसार, हरमन बावेजा नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये विभीषणाची भूमिका साकारू शकतो. हरमन बावेजाने हंसल मेहताच्या ‘स्कूप’ शोमधून पुनरागमन केले आहे, ज्यामध्ये त्याने JCP हर्षवर्धन श्रॉफची भूमिका साकारली होती. हरमन बावेजाला लंकेचा राजा रावणाचा धाकटा भाऊ, तसेच कुंभकर्ण आणि शूर्पणखाचा भाऊ विभीषणाची भूमिका साकारताना पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल असे दिसते. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

‘रामायण’ची स्टारकास्ट निश्चित झाल्यानंतर या महिन्याच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊ शकते. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रणबीर कपूरला भगवान रामाच्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

राम चरणने घेतली स्वयंपाकघराची जबाबदारी, ‘या’ खास व्यक्तीसाठी बनविले जेवण
पूजा हेगडेसोबत रोमान्स करणार अहान शेट्टी, नवीन ‘सनकी’ चित्रपटाची केली घोषणा

हे देखील वाचा