Saturday, March 2, 2024

ठरलं रे! परिणीती बनणार दिल्लीची सून, लग्नाच्या बातमीवर ‘या’ गायकाचं शिक्कामोर्तब

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा माेठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. नुकतेच, हे जोडपे मुंबईत सलग दोन डिनर आणि लंच डेटवर स्पॉट झाले होते, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या अफवा तुफान व्हायरल झाल्या. दोघेही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगून असताना या सगळ्या दरम्यान गायक आणि अभिनेता हार्डी संधूने परिणीती आणि राघव लवकरच लग्न करणार असल्याचं दुजोरा दिला आहे.

माध्यमाना दिलेल्या मुलाखतीदरम्यान हार्डीने सांगितले की, परिणीती फाइनली आपल्या आयुष्यात सेटल हाेत आहे, याचा मला आनंद आहे. ताे म्हणाला, “अखेर हे घडत असल्याने मला खूप आनंद होत आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो.” त्याने हे देखील शेअर केले की, जेव्हा तो त्याच्या 2022 च्या स्पाय-थ्रिलर ‘कोड नेम: तिरंगा’ चे शूटिंग करत होता तेव्हा त्याच्या लग्नाबद्दल चर्चा झाली होती. तो म्हणाला, “जेव्हा आम्ही कोड नेम: तिरंगा या चित्रपटाचे शूटिंग करत होतो, तेव्हा आम्ही लग्नाची चर्चा करायचो आणि ती म्हणायची ‘मी तेव्हाच लग्न करेन जेव्हा मला वाटेल की, मला योग्य मुलगा सापडला आहे’.” त्याने परिणीतीशी फोनवरून बोलून तिचे अभिनंदन केल्याची पुष्टीही केली. तो म्हणाला, “हो, मी तिला फोन करून अभिनंदन केले.”

याआधी आम आदमी पक्षाचे नेते संजीव अरोरा यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर राघव आणि परिणीतीला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी लिहिले, “मी राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या युनियनला खूप प्रेम, आनंद आणि पाठिंबा मिळो. माझ्या शुभेच्छा!!!”

दुसरीकडे, लग्नाच्या अफवांदरम्यान बुधवारी रात्री परिणीती आणि राघव दिल्ली विमानतळावर एकत्र स्पाॅट झाले. यावेळी पत्रकारांना टाळत परिणिती घाईघाईत कारमध्ये बसताना दिसली.(harrdy sandhu confirms bollywood actress parineeti chopra and raghav chadha to get married soon)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिंहासनासाठी होणार महायुद्ध; ‘पोन्नियन सेल्वन 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ऐश्वर्या राय ठरली लक्षवेधक

ये रिश्ता क्या कहलाता है? परिणीती चक्क पॅपराझींना टाळत बसली राघव चढ्ढाच्या गाडीत अन्…

हे देखील वाचा