मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच त्यांच्या आयुष्यातील रंजक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. चाहते देखील आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल काय नवीन माहिती समोर येते याकडे लक्ष लावून बसलेले असतात. अनेक चाहते, तर त्यासाठी आवडत्या कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट सातत्याने चाळत असतात. अनेक चाहते आपल्या आवडत्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुकता दर्शवतात.
मराठी कलाविश्र्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) ही चाहत्यांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे. अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती अनेकदा तिचा पती उमेश कामतबरोबर देखील अनेकदा फोटो शेअर करताना दिसली आहे.
प्रिया आणि उमेश यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. तुम्ही जर त्यांच्या चाहत्यांपैकी एक असाल, तर तुमच्यासाठी देखील ही छान माहिती महत्त्वाची ठरणार आहे. प्रिया आणि उमेश यांच्या घरात त्या दोघांच्या व्यतिरिक्त कोण राहतं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींबद्दल.
काही दिवसांपूर्वीच प्रियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या कुटुंबातील सर्व व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रिया, तिचा पती उमेश, तिचे आई-वडील, तिची मोठी बहीण दिसत आहे. यावरून हे लक्षात येते की, प्रियाच्या घरात आई-वडील आणि पती उमेश आहे. त्याचबरोबर हा फोटो जुना आहे.
प्रियाच्या कुटुंबातील व्यक्तींबद्दल बोलायचे झाले, तर तिच्या मोठ्या बहिणीचे नाव श्वेता बापट आहे. श्वेता बापट देखील तिच्या आयुष्यात सेटल असून, ती सेलिब्रिटी स्टायलिस्ट आणि कॉश्च्युम डिझायनर आहे. श्वेता ही प्रियासह अनेक सेलिब्रिटींची स्टायलिस्ट आहे. त्याचबरोबर या दोन्ही बहिणींचा ‘सावेंची’ नावाचा साडीचा ब्रँड आहे. जो खूप फेमस आहे.
नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपट अशा अनेक माध्यमांतून आपल्या अभिनयाची छाप सोडणार्या प्रिया बापटने अत्यंत कमी कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकली. प्रियाने ‘वजनदार’, ‘टाईमपास 2′ ‘आंधळी कोशिंबीर’, ‘काकस्पर्श’ ‘टाईमप्लीज’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. (have you seen the photo of priya bapats family see who is in her family)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्याने कामाच्या केलेल्या कौतुकाबद्दल सांगताना, भावुक झाला अभिनेता भरत जाधव म्हणाला…
‘तो डबल मिनींग मेसेज करायचा,’ अभिनेत्रीने केला होता सिद्धार्थ शुक्लावर गंभीर आरोप