नाटकाच्या रंगमंचावर झाला उमेश कामतचा वाढदिवस साजरा, व्हिडिओ शेअर करून मानले आभार!


मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम आणि टॅलेंटेड अभिनेत्यांच्या यादीत उमेश कामतचे (Umesh Kamat) नाव सर्वात उच्च स्थानी येते. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची एकही संधी तो सोडत नाही. सोशल मीडियावर देखील तो मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याच्याबाबत अनेक गोष्टी तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतेच रविवारी (१२ डिसेंबर) त्याने त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. यानिमित्त वाढदिवस साजरा करताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

उमेशने अलीकडेच अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा वाढदिवस साजरा होताना दिसत आहे. खास म्हणजे हा वाढदिवस नाटकाच्या रंगमंचावर साजरा झाला आहे. त्याचे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचे प्रयोग सध्या सुरू आहेत. तेव्हा तिथेच मंचावर प्रेक्षकांच्या समोर त्याचा वाढदिवस साजरा झाला आहे. यावेळी तिथे नाटकातील कलाकार अद्वैत दादरकर, ऋता दुर्गुळे, आरती मोरे तसेच त्याची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बापट देखील तिथे उपस्थित होती. त्यावेळी सगळ्या स्पर्धकांसमोर आणि कलाकारांसोबत तो केक कापून वाढदिवस साजरा करतो. (Umesh kamat share his birthday celebration video on social media)

हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय वाढदिवस. रंगमंचावर, प्रेक्षकांसमोर, हाऊसफुल गर्दीत. माझा दिवस एवढा सुंदर बनवल्या बद्दल सगळ्यांना धन्यवाद.” त्याच्या या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

 

उमेश हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी चित्रपटात, मालिकांमध्ये तसेच नाटकात काम केले आहे. त्याने ‘बाळकडू’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘लग्न पहावे करून’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. सध्या तो सोनी मराठीवर ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत काम करत आहे.

उमेशच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘अलिबाग आणि चाळिशीतील चोर’ असे आहे. या चित्रपटाबाबत आणखी जास्त कोणतीच माहिती समोर आली नाही. पण उमेशने त्याचे हे फोटो शेअर करून चित्रपटातील त्याच्या व्यक्तीरेखेबद्दल साधारण माहिती दिली आहे. त्याचे चाहते त्याचा हा नवीन चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!