बिग बॉसचे तेरावे पर्व गाजवणारा आणि ट्रॉफी आपल्या नावे करणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा गुरुवारी (2 सप्टेंबर 2021) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या बातमीने सर्व कलाकारांसोबतच त्याच्या सगळ्या चाहत्या वर्गाला दुःखद धक्का बसला होता. अशातच आज म्हणजे साेमवारी (दि. 12 डिंसेबर)ला अभिनेत्याची जयंती आहे. चला तर मग यानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्याच्या जीवनातील चढ- उतार.
रॅश ड्रायव्हिंगमुळे अटक
मागच्या वर्षी सिद्धार्थ शुक्लाला रॅश ड्रायव्हिंग केसमध्ये अटक झाली होती. तो अत्यंत वेगाने गाडी चालवत होता पण नंतर त्याला गाडीवर कंट्रोल करता आला नाही आणि तो तीन गाड्यांना धडकला. या नंतर त्याला पोलिसांनी अटक केले होते पण त्याने नुकसान भरपाई केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. तसेच 2014 साली त्याला ड्रंक अँड ड्राईव्ह केसमध्ये अटक करण्यात आली होती. परंतु 2000 रुपयांचा दंड भरल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली होती. (Let’s know about Five Controversies of siddharth Shukla’s life)
सिद्धार्थ शुक्ला व रश्मी देसाईमधील वाद
अनेकांनी सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्या अफेअरबद्दल माहिती आहे. पण बऱ्याच जणांना हे माहीत नाही की, त्याच्यात आणि रश्मीमध्ये नक्की असे काय झाले की, त्यांचा ब्रेकअप झाला. ते दोघेही ‘दिल से दिल तक’ या मालिकेत एकत्र दिसले होते. अनेक वर्ष ते दोघे एकमेकांना डेट करत होते. पण नंतर हळूहळू त्यांच्यातील गोष्टी बिघडायला लागल्या आणि या गोष्टीचा परिणाम त्यांच्या कामावर होऊ लागला. त्यानंतर त्याने रश्मीसोबत शूटिंग करणे थांबवले. परंतु नंतर बिग बॉसच्या घरात त्यांचा पुन्हा एकदा आमना सामना झाला झाला पण अनेकवेळा त्यांच्यात वाद झाले.
सहकलाकाराचा गंभीर आरोप
सिद्धार्थ शुक्लाचा सह-कलाकार कुणाला वर्मा एकदा त्याच्या मुलाखतीत सिद्धार्थला अनप्रोफेशनल असे म्हटला होता. तो त्याच्या मुलाखतीत म्हणाला होता की, “तो खूप अनप्रोफेशनल आणि वेडा आहे. मला असे वाटते की, त्याला मानोसोपचारतज्ज्ञाची गरज आहे. मी असे ऐकले होते की, त्याने एकदा रिहाबला भेट दिली होती पण मला असे वाटते की, त्याने पुन्हा एकदा तिथे जायला पाहिजे.”
डबल मिनींग मेसेजचा झाला होता आरोप
सिद्धार्थची ‘बालिका वधू’ या मालिकेतील सह-कलाकार शीतल खांदलने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तो डबल मिनिंग जोक करतो. ती म्हणाली की, “मी तेव्हा खूप जास्त हसत होते जेव्हा बिग बॉसमध्ये सिद्धार्थने आरती सिंगची बाजू घेतली होती आणि तिच्या बाजूने बोलला होता. पण वैयक्तिक आयुष्यात त्याने माझ्यासोबत ज्या गोष्टी शेअर केलेल्या आहे आणि जे काही माझ्याशी बोलला आहे, ते आरतीशी बोलण्याच्या तुलनेत खूप आहेत. तो अनेकवेळा अश्लील आणि डबल मिनींग जोक करत करायचा. त्याने केलेल्या काही कमेंट्स तर मी तुमच्या सोबत शेअर देखील करू शकत नाही. त्यानंतर मी त्याची तक्रार निर्मात्यांकडे केली होती. परंतु दुसऱ्या दिवशी तो जेव्हा सेटवर आला तेव्हा त्याने माझ्याविरूद्ध आवाज उठवला. बॉडी शेमिंगपासून तर त्याने अनेक अपमानास्पद वक्तव्य केले आहे. पण आता ‘बिग बॉस १३’ मध्ये तो स्वतःला एक महान व्यक्ती आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.”
त्याला सर्वजण ज्याला ‘गोंधळाचा राजा’ असे म्हणत असे. त्याच्या बऱ्याच सह-कलाकारांनी सांगितले होते की, तो सेटवर खूप चिडचिड करत असायचा. त्याच्या एका सह-कलाकाराने सांगितले होते की, तो अनेकवेळा शूटिंगसाठी उशिरा यायचा आणि सर्वांना त्याची वाट पाहावी लागायची.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय सिद्धार्थ शुक्लाचं नाव; तर काजोलच्या बहिणीचाही आहे यादीत समावेश
अचानक एक्सिट घेतलेल्या अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहे का?