Wednesday, February 21, 2024

एड्ससंबंधी जागरूकता निर्माण करणारे बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट बघितलेत का? वाचा यादी

जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या आजाराबाबत लोक लवकर बोलात देखील नाहीत. डॉक्टर अनेकदा रुग्णालये आणि वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून लोकांना जागरूक करत असतात. इतकंच नाही तर एड्ससारख्या घातक आजाराबद्दल लोकांना माहिती मिळावी म्हणून हिंदी सिनेमांचं विशेष योगदान आहे. दिग्दर्शक वेळोवेळी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना एड्सविषयी जागरूक करत आहेत. बॉलीवूडमध्ये एड्सवर अनेक चित्रपट बनले आहेत ज्यांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया जागतिक एड्स दिनानिमित्त त्या चित्रपटांबद्दल..

‘फिर मिलेंगे’
शिल्पा शेट्टी, सलमान खान आणि अभिषेक बच्चन अभिनित ‘फिर मिलेंगे‘ हा चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एड्स हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. ‘फिर मिलेंगे’ हा चित्रपट (Bollywood movies) रेवती मेनन यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात काम करण्यासाठी स्टार्सनी मानधनही घेतले नसल्याचे बोलले जात आहे.

‘माय ब्रदर… निखिल’
एड्सवर आधारित हा चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री जुही चावला, संजय सुरी आणि पूरब कोहली मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट एका एड्स कार्यकर्त्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात संजय सुरीने समलिंगी व्यक्तीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओनीरने केले आहे.

’68पेजेस’
’68पेजेस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीधर रंगायन यांनी केले आहे. हा चित्रपट 2007 साली आला होता. हा चित्रपट एचआयव्ही समुपदेशक आणि त्याच्या पाच बळींवर आधारित आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसेल, पण 68 पेजेसला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

‘निदान’
‘निदान’ हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ दिग्दर्शक आणि कलाकार महेश मांजरेकर यांनी केले होते. या चित्रपटात शिवाजी सातमस, रीमा लागू आणि निशा बैन्स यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा एका मुलाची आहे. जो रक्तदान करताना एड्सचा बळी ठरतो. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. चित्रपटाची चमकदार कथा लक्षात घेऊन ‘निदान’ काही काळानंतर करमुक्त करण्यात आले. (Have you seen these Bollywood movies that create awareness about AIDS)

आधिक वाचा-
असं कुणासोबतही होऊ नये! ‘एड्स’मुळे जीव गमावणारे प्रसिद्ध कलाकार, एका भारतीय अभिनेत्रीचाही समावेश
आजोबा असावेत तर असं! लाडक्या दादूसने नातवासाठी गायली अंगाई; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा