Saturday, July 27, 2024

साठच्या दशकातील ‘चॉकलेट हिरो’, ज्याचे संपूर्ण कुटुंब होते चित्रपट उद्योगात

‘लव्ह इन शिमला’ या चित्रपटातून मुख्य नायकाच्या भूमिकेत प्रवेश करणारे प्रसिद्ध अभिनेते म्हणजेच ‘जॉय मुखर्जी’. १९६० च्या दशकातील ते नावाजलेला अभिनेते होते. बॉलिवूड चित्रपटात अनेक देखण्या आणि हुशार कलाकारांनी सर्वांच्याच मनावर राज्य केले आहे. त्यातीलच हे एक अभिनेते. त्या काळातील चॉकलेट बॉय अशी त्यांची ओळख होती. त्याच्या रूपावर अनेक तरुणी घायाळ व्हायच्या, असे त्यांचे देखणे रूप होते.

त्यांचा ‘लव्ह इन शिमला’ हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा भल्याभल्यांना त्यांनी आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध करून सोडले होते. इतकेच नव्हे तर अनेक तरुणी अक्षरश: त्यांच्यासाठी वेड्या झाल्या होत्या. कमी वयातच त्यांनी आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष दिले होते. बॉलीवूडमधील कोणत्याही अभिनेत्याला टक्कर देईल अशी बॉडी त्यांनी बनवली होती. खरं तर सलमान खानऐवजी जॉय मुखर्जी यांच्या मार्फतच शर्टलेसचा ट्रेंड आला आहे, असं म्हणण्यास वावगे ठरणार नाही. त्यांची खासियत अशी होती की, काहीही झाले तरी ते आपला व्यायाम कधीच चुकवत नसत. आपल्या तंदुरुस्तीवर ते विशेष लक्ष देत असत.

अभिनयाव्यतिरिक्त त्यांना इतर खेळात देखील रस होता. ज्यात ते कधी कुस्ती खळत असत, तर कधी फुटबॉल आणि याशिवाय बॉक्सिंगचीही त्यांना विशेष आवड होती.

जॉय मुखर्जी यांचे संपूर्ण कुटुंब हे चित्रपट उद्योगातील होते. त्यांचे वडील सशधर मुखर्जी निर्माते आणि फिल्मालय स्टुडियोचे संस्थापक होते. दादामुनी उर्फ अशोक कुमार यांची बहीण सती देवी यांच्याशी सशधर मुखर्जी यांनी विवाह केला होता. त्याशिवाय जॉय यांचे बंधू शोमू यांनी अभिनेत्री तनुजाशी विवाह केला होता. त्यांना काजल आणि तनिषा या दोन मुली आहेत.

अभिनेत्री आशा पारेख यांच्यासोबत जॉय यांनी केलेले सर्वच चित्रपट यशस्वी ठरले होते. त्यानंतरच्या काळात राजेश खन्ना, धर्मेंद्र आणि जितेंद्र यांच्या सारख्या नावाजलेल्या अभिनेत्यांचा समावेश चित्रपटात झाला. त्यानंतर जॉय यांच्या लोकप्रियतेत कमालीची घट दिसून आली. त्यानंतर अनेक चित्रपटात त्यांना आपल्या अभिनयाची योग्य अशी चुणूक दाखवता आली नाही.

पुढे त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते, यात ‘एक बार मुस्कुरा दो’, आणि ‘छैला बाबू’ या चित्रपटांचा समावेश होता. त्यात त्यांचा छैलाबाबू हा चित्रपट बऱ्यापैकी चालला. ज्यात झीनत अमान, राजेश खन्ना यांनी मोलाची भूमिका साकारली होती. त्यांचे ‘आप यु ही अगर हमसे मिलते रहे’ हे गाणे विशेष गाजले.

दिनांक ९ मार्च, २०१२ रोजी त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या फुफ्फुसाच्या त्रासामुळे त्यांना श्वास घेण्यास अडथळा येऊ लागला, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाला. आज त्यांचा मृत्यू होऊन नऊ वर्षे पूर्ण झाली असली, तरी त्यांनी भारतीय चित्रपसृष्टीत आजही त्याचे नाव कायम आदराने घेतले जाते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियाला अचानक ठोकला रामराम, पोस्ट शेअर करत दिली माहिती
अत्यंत वादग्रस्त : ‘स्वरा भास्कर जर हजारो पुरुषांसोबत रात्र घालवणार…’, अयोद्धेतील महंताच्या विधानाने खळबळ

हे देखील वाचा