Friday, April 26, 2024

जखमी पक्ष्याला पाहून विचलित झालेल्या शिल्पा शेट्टीच्या मुलीने बोबड्या आवाजात म्हटला गायत्री मंत्र

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सर्वात सक्रिय असणारी अभिनेत्री आहे. २०२१ हे वर्ष शिल्पासाठी आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूपच खडतर होते. मात्र वर्षाचा शेवट शिल्पासाठी चांगला झाला. मागील दोन वर्षांपासून शिल्पासाठी नवीन वर्ष खूपच खास असते. कारण नवीन वर्ष सुरु झाले की, दुसऱ्याच महिन्यात तिच्या मुलीचा समिशाचा वाढदिवस येतो. यावर्षी समिशा दोन वर्षाची पूर्ण होणार असून, लवकरच तिचा वाढदिवस येणार आहे. शिल्पा अनेकदा समिशाचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नेटकऱ्यांमध्ये देखील समिशा खूपच प्रसिद्ध आहे. शिल्पाने नुकताच समिशाचा एक क्युट आणि सुंदर व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

शिल्पाच्या घराच्या गार्डनमध्ये एका पक्षी जखमी अवस्थेत बसला होता. त्याला बघून समिशा जरा विचारात पडली. त्यानंतर जे काही घडले त्याचाच हा व्हिडिओ आहे. शिल्पा आणि समिशा व्हिडिओमध्ये त्यांच्या गार्डनमध्ये फिरताना दिसतात. तेवढ्यात समिशाला एक गरदनमध्ये एक पक्षी दिसतो जो शांत बसला आहे. कदाचित त्याला जखमी झाल्यामुळे उडता येत नसावे. शिल्पा समिशाला तो पक्षी बरा होण्यास्तही प्रार्थना करायला सांगते, आणि ती गायत्रीमंत्र म्हणताना दिसते. समिशा देखील आईसोबत गोड बोबड्या आवाजात गायत्रीमंत्र म्हणण्याचा प्रयत्न करते.

शिल्पा आणि समिशाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना तुफान आवडत असून तो इंटरनेटवर खूपच व्हायरल होत आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “लहान मुलांचे हृदय खरंच खूप स्वच्छ असते. हे बघणे खूपच छान आहे की, समिशा (अजून दोन वर्षाची देखील झाली नाही) ती त्या पक्ष्यासाठी दया आणि संवेदना जाणवू शकते. ती खूपच सहज जाणवून घेत आहे की, केव्हा आणि कोणासाठी प्रार्थना आणि विनाअट प्रेम आवश्यक असते.

शिल्पा शेट्टीची मुलगी समिशाचा जन्म १५ फेब्रुवारी २०२० रोजी झाला. शिल्पाने २१ फेब्रुवारी २०२० ला सोशल मीडियावर ती एका मुलीची आई झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना सांगितली होती. समिशाचा जन्म सरोगसीचा माध्यमातून झाला आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा