Monday, June 24, 2024

‘स्क्विड गेम’ला बाजूला सारत ‘हेलबाउंड’ सिनेमा बनला नेटफ्लिक्सवर सर्वात जास्त पाहिला जाणारा सिनेमा

सध्याच्या काळात वेबसिरीज तुफान गाजताना दिसत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यामुळे कोणत्याही भाषेतील, देशातील वेबसिरीजला आपण आपल्या घरात बसून बघू असतो. ओटीटीमुळे आपल्या मनोरंजनावर कोणत्याही प्रकारच्या मर्यादा येत नाही. वेगवेगळ्या देशातील अनेक वेबसिरीज देशात किंबहुना जगात गाजताना दिसतात. मागील काही काळापासून ‘स्क्विड गेम्स’ तुफान हिट होत होती. आता दक्षिण कोरियाचा हॉरर सिनेमा ‘हेलबाउंड’ जबरदस्त हिट होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी ‘हेलबाउंड’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित होताच सिनेमाने धमाका केला आहे. ‘हेलबाउंड’ प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच नेटफ्लिक्सवर पहिल्या नंबरची जागा मिळवली आहे. ‘हेलबाउंड’ने नेटफ्लिक्सची टॉप सिरीज असलेल्या ‘स्क्विड गेम्स’ला बाजूला सारत पहिल्या क्रमांकाची जागा मिळवली आहे. नेटफ्लिक्सवर मागील काही काळापासून ‘स्क्विड गेम्स’ला सर्वात जास्त पाहिले गेले. या शोने बऱ्याच काळापासून नंबर वनच्या जागेवर होती. मात्र ‘हेलबाउंड’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि ‘स्क्विड गेम’ची जागा हालली. ‘हेलबाउंड’च्या प्रदर्शनानंतर लगेचच म्हणजे दुसऱ्या दिवशी ‘हेलबाउंड’ ही नेटफ्लिक्सवर सर्वात जास्त पाहिला जाणारा सिनेमा बनला आहे.

‘हेलबाउंड’ चित्रपट १९ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. स्ट्रीमिंग झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘स्क्विड गेम’ला भारतासह ८४ देशांमध्ये मात देऊन पाहिले स्थान पटकावले आहे. ‘हेलबाउंड’चे दिग्दर्शन येओन सांग-हो यांनी केले आहे. येओन सांग-हो यांनी ‘ट्रेन टू बुसान’, ‘पेनिनसुला’ या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘हेलबाउंड’ हा एक धार्मिक समूहांवर आधारित हॉरर सिनेमा असून, जो दैवी न्यायचा विचारांचा प्रचार करत असतो. ‘हेलबाउंड’ या सिनेमात प्रसिद्ध कोरियन अभिनेते यू आह-इन, पार्क जियोंग-मिन, किम ह्यून-जू, वोन जिन-ए आदी कलाकार मुख्य भूमिकेत झळकत आहेत.

तर ‘स्क्विड गेम’चे दिग्दर्शन ह्वांग डोंग-ह्युक यांनी केले असून, ही सिरीज देखील प्रदर्शित झाल्यानंतर लगेच टॉपवर पोहचली होती. सध्या ही सिरीज दुसऱ्या स्थानावर आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जय गंगाजल’च्या ‘त्या’ सीननंतर ढसाढसा रडू लागली होती प्रियांका चोप्रा, मग अभिनेत्याने…

-बोनी कपूर यांची इंस्टाग्रामवर एन्ट्री, मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी इंस्टावर आल्याचे अर्जुन कपूरने म्हणणे

-पोलिस म्हणून सलमान खानला आवडते ‘ही’ खास व्यक्ती; अभिनेत्याने सांगितले काही किस्से

हे देखील वाचा