Thursday, March 13, 2025
Home मराठी ‘मी अंतर्वस्त्र घालायचे की नाही, ही माझी चॉईस…’, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीने दिली जोरदार चपराक

‘मी अंतर्वस्त्र घालायचे की नाही, ही माझी चॉईस…’, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीने दिली जोरदार चपराक

सोशल मीडियावर ट्रोल होणे काही नवीन नाही. विशेष म्हणजे ट्रोल होणे आणि ट्रोल करणे हे सोशल मीडियावर सामान्य मानले जाते. छोट्या मोठ्या कलाकारांपासून ते अमिताभ बच्चन सारखे मोठमोठे कलाकार देखील या ट्रोलिंगला बळी पडतात. अशावेळी काही कलाकार या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, तर काहीजण ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देतात. असाच काहीसा प्रकार घडलाय, हेमांगी कवीसोबतही. मात्र अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्याला चांगलेच उत्तर दिले आहे.

अलीकडेच हेमांगीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तिने गोल पोळ्या कशा बनवाव्या याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केलं होतं. मात्र यात तिने घातलेल्या कपड्यांवरून तिचा प्रचंड ट्रोल करण्यात आलं. व्हिडिओच्या कमेंटमध्ये व डीएम्समध्ये देखील तिला बरं वाईट बोलण्यात आलं. या सर्व ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत, तिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीद्वारे तिने कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच झापलं आहे.

स्टोरीमध्ये हेमांगीने लिहिलं की, “हो मला स्तन आहेत. त्याला स्तनाग्रेही आहेत अगदी पुरुषांसारखी! जसे चालताना माझे हातपाय हलतात, तसेक काम करताना माझे स्तन हलतात. कारण मी सस्तन प्राणी आहे. मादी आहे! ज्यांचे हलत नाहीत अशांना माझा त्रिवार सलाम. आता मी घरात, बाहेर, सोशल मीडियावर अंर्तवस्त्र (ब्रा) घालायची कि नाही ही माझी चॉईस आहे. या व्हिडीओत दिसणारे माझे स्तन आणि स्तनाग्रे, त्यावरून मला जज करण्याचा, अश्लिलतेचा, माझ्या संस्कारांचा माझ्या बुद्धीमत्तेचा, माझ्या इमेज विषयी घाणेरड्या चर्चा, गॉसिप करून जो काय संबध जोडताय ती तुमची चॉईस.” असं म्हणत तिने ट्रोलर्सची बोलती बंद केलेली पाहायला मिळाली.

यासोबत पुढे हेमांगी म्हणतेय की, “मला डायरेक्ट मेसेज करून माझ्या विषय काळजी दाखवणाऱ्या हितचिंतकांनो..चिल… या एवढ्या चिंधी गोष्टीवरुन मला अनफॉलो करावसं वाटतं असेल तर खुशार करावं. विचित्र विचारांचे फॉलोअर्स नसलेलं कधीही चांगल.” हेमांगी कवीने ट्रोलर्सला उत्तर देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही बऱ्याचदा तिने सडेतोड उत्तरं देत त्यांना धारेवर धरलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-क्रिती सेननच्या ‘मिमी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ; प्रेक्षकांकडून मिळतोय तूफान प्रतिसाद

-महाराष्ट्रातल्या मातीतला एक खलनायकी अन् रांगडा चेहरा ‘निळू फुले’; उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर गाजवलीत त्यांनी चार दशकं

-‘जाने क्या बात है!’ अन्विताने शेअर केला ‘ओम-स्वीटू’चा रोमँटिक फोटो; चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

हे देखील वाचा