Tuesday, June 25, 2024

अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘हेरा फेरी 3’च्या शूटिंगला सुरुवात, चित्रपटाच्या सेटवरचा फोटो व्हायरल

मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना ‘हेरा फेरी’ सिनेमाच्या पुढच्या भागाची प्रतीक्षा होती. हेरा फेरीनंतर फिर हेरा फेरी सिनेमा आला आणि त्यानंतर दर्शक आतुरतेने तिसऱ्या भागाची वाट पाहात होते. त्यांना नेहमीच यावर्षी हा सिनेमा येणार असे सांगत अनेक वर्षांचा काळ गेला. मात्र आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यातच आता एक आनंदची बातमी म्हणजे हेरा फेरीच्या आगामी भागात अक्षय कुमारचा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या तिघांनी हेरा फेरी ३ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या शूटिंगच्या सेटवरचा एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिघेही त्यांच्या लूकमध्ये दिसत आहे.

अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचा आयकॉनिक कॉमेडी सिनेमा ‘हेरा फेरी ३’ सिनेमाची शूटिंग २१ फेब्रुवारीला सुरु झाली. याचा एक प्रोमो शूट केला गेला. आता याच शूटिंगचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अक्षय, परेश आणि सुनील शेट्टी यांची एक झलक दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार हा फोटो सिनेमाच्या प्रोमो शूटचा आहे.

या फोटोमध्ये अक्षय त्याच्या ‘राजू’ या भूमिकेत दिसत असून, त्याने लाल रंगाची पँट आणि प्रिंटेड शर्ट घातला आहे. तर परेश रावल त्यांच्या हिट अशा ‘बाबुराव’ या भूमिकेत दिसत आहे. त्यांनी पांढरी धोती आणि कुर्ता घातला आहे. तर सुनील शेट्टी ‘श्याम’च्या भूमिकेत कॅज्युअल डार्क शर्ट आणि पँटमध्ये स्लीपर घालून दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर फॅन्सच्या आनंदला पारावर उरला नाही. सतत सोशल मीडियावर कमेंट्स करत फॅन्स या सिनेमाची आतुरतेने वाट बघत असल्याचे सांगत आहे. अजून या सिनेमाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी पुढच्या वर्षी सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी दुःखद निधन

साऊथ इंडस्ट्रीमधील ‘हे’ दिग्गज अभिनेते किडनी स्टोनवरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल

हे देखील वाचा