Tuesday, October 22, 2024
Home बॉलीवूड ‘हिरोपंती २’ चित्रपटातील ‘जलवानुमा’ गाण्यात दिसली टायगर आणि ताराची सिझलिंग केमिस्ट्री

‘हिरोपंती २’ चित्रपटातील ‘जलवानुमा’ गाण्यात दिसली टायगर आणि ताराची सिझलिंग केमिस्ट्री

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff)  आणि क्रिती सेनन (Kriti sanon) हिरोपंती चित्रपटाची सर्वत्र चर्चा झाली होती. या चित्रपटाची कथा आणि गाणी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. आता या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटात आता पून्हा एकदा टायगरची जबरदस्त एक्शन पाहायला मिळणार आहे. या आगामी चित्रपटात टायगर आणि तारा सुतारियाची दमदार केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले आहे. जे सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया स्टारर ‘हिरोपंती २’ मधील ‘जलवानुमा’ हे नवीन गाणे आज रिलीज झाले आहे. या गाण्याला ए आर रहमानने संगीत दिले आहे. तर गाणे जावेद अली आणि पूजा तिवारी यांनी गायले आहे. या गाण्यातील टायगर आणि ताराची केमिस्ट्री लोकांना खूप आवडत आहे. २९ एप्रिल २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर यापूर्वीच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये टायगरची अ‍ॅक्शन आणि खलनायक बनलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा लूक पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. त्याचबरोबर या दोघांनीही आपापल्या स्टाईलने चित्रपटात सर्वांची मने जिंकली आहेत.

‘हिरोपंती २’ चे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे आणि साजिद नाडियाडवाला निर्मित आहे. अहमद खानने यापूर्वी ‘बागी २’ आणि ‘बागी ३’ सारखे दमदार चित्रपट तयार केले आहेत. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी लैलाची भूमिका साकारत आहे. चित्रपटात टायगरच्या पात्राचे नाव बबलू आहे, त्याचप्रमाणे तारा सुतारिया इनायाची भूमिका साकारत आहे.

हिरोपंती 2 चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटात टायगर आणि नवाज यांची चित्रपटात जबरदस्त एक्शन पाहायला मिळणार आहे, तर दुसरीकडे टायगर-तारा यांचा रोमान्स पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. दोघांचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. २०१९ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. चित्रपटातील गाणी लोकांना खूप आवडली होती मात्र या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना फारशी आवडली नव्हती. त्यामुळे हा चित्रपट फारसा यश मिळवू शकला नव्हता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा