Monday, July 15, 2024

Heropanti 2 | ‘जलवानुमा’ गाण्याचा टीझर आऊट, टायगर श्रॉफने इंस्टाग्रामवर लिहिले ‘असे’ काही

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) फिल्मी दुनियेत खूप वेगाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो त्याच्या चित्रपटांमधील उत्कृष्ट डान्स आणि धमाकेदार ऍक्शनसाठी ओळखला जातो. अभिनेता लवकरच त्याचा आगामी चित्रपट ‘हिरोपंती २’ मध्ये दिसणार आहे. ऍक्शनने भरलेला हा चित्रपट २९ एप्रिलला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, ‘जलवानुमा’ चित्रपटातील एका गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे संपूर्ण गाणे उद्या म्हणजेच शुक्रवारी (१ एप्रिल) येणार आहे. या चित्रपटाला ए आर रहमान यांचे संगीत आहे. त्याचबरोबर हे गाणे जावेद अली आणि पूजा तिवारी यांनी गायले आहे.

या गाण्याचा टीझर लोकांना खूप आवडला आहे. सोशल मीडियावर आतापर्यंत लाखोंनी टीझर पाहिला आहे. टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्रामवर या गाण्याचा टीझरही शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जलवानुमा मधुर सुरांनी तुटलेली हृदये भरून काढत आहे.” टायगरच्या या पोस्टवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

टायगर-तारा दुसऱ्यांदा दिसणार आहेत एकत्र
टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) हे दुसऱ्यांदा एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी दोघेही ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ मध्ये एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसले होते. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

प्रेक्षकांना आवडला ट्रेलर
नुकताच ‘हिरोपंती २’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला. जे प्रेक्षकांना खूप आवडले. या चित्रपटाचा ट्रेलर आतापर्यंत ६ कोटी १० लाख वेळा पाहिला गेला आहे. ट्रेलरमध्ये टायगरची जबरदस्त ऍक्शन पाहून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो लैला नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. ‘हिरोपंती २’ चे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे. यापूर्वी त्याने ‘बागी ३’ बनवला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा