Sunday, April 14, 2024

बाबाे! उर्फी जावेदने तुरुंगातून व्हिडिओ केला शेअर; म्हणाली, ‘संपूर्ण भारताला मला असं…’

उर्फी जावेद सध्या दुबईत असून तिचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. उर्फीला तिच्या बोल्ड आउटफिटमुळे दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले, अशा बातम्या चर्चेत आहेत. या बातमीनंतर उर्फीला खूप ट्रोलही करण्यात आले, अनेक धमक्याही मिळाल्या. अशा बातम्यांवर उर्फीने समाजाचा दृष्टिकोन मांडताना तिची व्यथा मांडली आहे. उर्फीने सोशल मीडियावर अनेक फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करून समाजातील वास्तव दाखवले आहे.

उर्फी जावेद (urfi javed) हिने ती तुरुंगात असतानाचा एक व्हिडिओ (फिल्टरसह) शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले, “संपूर्ण भारताला यावेळी मला असेच पाहायचे आहे.” तिच्या या व्हिडिओवर एका युजर्सने कमेंट करत लिहिले की, “थॅंक यू दुबई, कृपया तिला तिथेच ठेवा.” उर्फीने देखील त्या कमेंटवर प्रतीउत्तर दिले आहे.

urfi-javed
Photo Courtesy: Instagram/urf7i

उर्फीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती म्हणतेय, “तुम्ही पाहाल तर दोन प्रकारच्या स्टाेरी सुरू आहेत. एक म्हणजे मला दुबई तुरुंगात पाठवणे आणि दुसरे म्हणजे माझ्यावर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली. मात्र, लोकांना मला तुरुंगात पाहण्यात जास्त रस आहे. मी ट्विट वाचले, लोकांनी लिहिले की, ‘तिला तुरुंगात ठेवा, तिला परत पाठवू नका वगैरे..’तुम्ही हिप्पोक्रसी पाहत आहात, लोकांना बलात्कार करणाऱ्या माणसाची अडचण नाही, पण तिच्या आवडीचे कपडे परिधान करणार्‍या महिलेच्या शरीराची समस्या आहे.”

urfi-javed
Photo Courtesy: Instagram/urf7i

दुबई तुरुंगात असल्याबद्दल बोलताना उर्फी जावेदने माध्यमांशी बाेलताना सांगितले की, “पोलिस तिच्या शूटिंगच्या ठिकाणी नक्कीच आले होते, पण अटक करण्यासाठी नाही तर शूटिंग थांबवण्यासाठी.”

ती ज्या सार्वजनिक ठिकाणी शूटिंग करत होती तिथे शूटिंगची वेळ ठरलेली असते आणि आम्ही त्या ठराविक वेळेत शूटिंग करत नव्हतो, असे उर्फीने सांगितले.(tv actre`s`s urfi javed point out the hypocracy she faced amid jail news society ki asaliyat share video)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रिअल लाईफ हिरो! तस्करीमध्ये अडकलेल्या तब्बल 128 महिलांना सुनील शेट्टीने दिले जीवनदान

‘मी कधीही पैशांसाठी लग्नसोहळ्यात नाचले नाही’, कंगनाने थेट गाणसम्राज्ञी लता मंगेशकरांशीच केली तुलना

हे देखील वाचा