Thursday, April 18, 2024

ऐश्वर्या-अभिषेकने कुटुंबासोबत लुटला होळीचा आनंद, आराध्याचेही फोटो व्हायरल

काल सर्वत्र होळी साजरी झाली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील होळीचा आनंद लुटला आहे. बच्चन कुटुंबाने देखील मिथ्या उत्साहाने होळी साजरी केली आहे. त्यांनी त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan

आणि मुलगी आराध्या देखील दिसत आहे. या फोटोंमध्ये ते होळीचा चांगलाच आनंद घेताना दिसत आहे. त्यांनी आधी त्यांच्या फॅमिलीसोबत होळी साजरी केली आणि नंतर त्यांच्या मित्रांसोबत होळी साजरी केली आहे.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी मुलगी आराध्याची होळी मोठ्या उत्साहात साजरी केली. याआधी हे दोन स्टार अमिताभ बच्चन आणि जया यांच्यासोबत होलिका दहनसाठी श्वेता बच्चन आणि नव्या नवेली नंदा यांच्यासोबत सामील झाले होते. यानंतर या जोडप्याने सायंकाळपर्यंत होळी साजरी केली. दोघेही आपल्या मुलीसोबत होळी साजरी करण्यासाठी पांढऱ्या कपड्यात दिसले.

अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याने त्यांच्या मित्रांसोबत होळी साजरी केली. त्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. होळी पार्टीच्या आतील फोटोंमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक एकमेकांचा हात धरताना दिसत आहेत. मुलगी आराध्या देखील होळीच्या सेलिब्रेशनमध्ये सामील झाली आणि तिच्या मैत्रिणींसोबत पोज देताना दिसली.

यावर्षी ते खास फोमची होळी खेळताना दिसले. फोटोंमध्ये ऐश्वर्या होळीच्या रंगांनी पूर्णपणे रंगलेली दिसत आहे. तिने चाहत्यांसोबत अनेक फोटो आणि सेल्फीही काढले. त्यांच्या होळी पार्टीचे फोटो चाहत्यांना खूप आवडतात.

बच्चन कुटुंबाशी भांडण झाल्याच्या बातम्यांदरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन काल कुटुंबासोबत होळीच्या पूजेला जाताना दिसली. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने होलिका दहनाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन देखील दिसत होते. त्यांनी एकत्र होळीही खेळली. यासोबतच त्यांनी चाहत्यांना या सणाच्या शुभेच्छाही दिल्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

कुटुंबासह दुबईला रवाना झाला अल्लू अर्जुन, त्याच्याच मेणाच्या पुतळ्याचे करणार अनावरण
श्रद्धा कपूरने दिली राहुल मोदींसोबतच्या नात्याची हिंट, अभिनेत्रीच्या गळ्यातील लॉकेट पाहून चर्चांना आले उधाण

हे देखील वाचा