बॉलिवूडमध्ये असे खूप कलाकार असतात, जे अगदी कमी वयात त्यांची लोकप्रियता हॉलिवूडपर्यंत नेतात. स्वतःला त्या कामाप्रती इतकं झोकून देतात की, यशाला देखील त्यांच्या पुढे झुकण्याशिवाय इतर कोणताही मार्ग उरत नाही. यातीलच कमी वयात यशाच्या शिखरावर पोहचलेली अभिनेत्री म्हणजे, माजी विश्वसुंदरी प्रियांका चोप्रा. तिचा लूक, स्टाईल, ॲक्टिंग, डान्स आणि मॉडेलिंगने सर्वांना तिचा दीवाना करणारी ही प्रियांका चोप्रा. आज प्रियांका तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी. (Birthday special : let’s know about priyanka Chopra’s life journey)
प्रियांका चोप्राचा जन्म १८ जुलै १९८२ मध्ये जमसेदपूरमध्ये झाला होता. तिने तिचे शिक्षण बरेलीमध्ये पूर्ण केले. प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा आणि वडील अशोक चोप्रा हे दोघेही डॉक्टर होते. प्रियांका चोप्रा ही लहानपणापासूनच खूप मस्तीखोर होती. त्यामुळे ती तीसरीला असतानाच तिच्या आई वडिलांनी तिला हॉस्टेलला टाकले होते. तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, ती अमेरिकेला पुढचे शिक्षण घेण्यासाठी गेली होती. तिकडे गेल्यावर तिला तिच्या सावळ्या रंगामुळे खूप हिणवले जात होते. त्यानंतर ती पुन्हा तिच्या घरी भारतात आली आणि तिचे उर्वरित शिक्षण तिने इथेच पूर्ण केले. लहान असताना प्रियांका चोप्राला डॉक्टर किंवा इंजिनिअर बनायचे होते.
प्रियांका चोप्राने बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत तिच्या अभिनयाच्या डंका मिरवला आहे. तिला २००० मध्ये मिस वर्ल्ड सोबतच पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यावेळी ती केवळ १८ वर्षांची होती. त्यानंतर २००२ साली तिने तमिळ चित्रपट ‘थमिजन’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. २००३ मध्ये तिला बॉलिवूडमध्ये सनी देओलचा चित्रपट ‘द हीरो’ मध्ये सहाय्यक अभिनेत्रीचे पात्र मिळाले होते. त्यानंतर अक्षय कुमारसोबत तिने ‘अंदाज’ या चित्रपटात काम केले, पण या चित्रपटात मुख्य भूमिकेत लारा दत्ता ही होती.
या सगळ्यानंतर तिचं आयुष्य बदललं ते ‘एतराज’ या चित्रपटामुळे. याआधी तिने ‘प्लॅन’, ‘किस्मत’ आणि ‘असंभव’ या चित्रपटात काम केले होते. पण ‘एतराज’ या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारून, तिने तिचे वेगळेच स्थान निर्माण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि करीना कपूर हे होते. या चित्रपटातील तिचा अंदाज, बोल्डनेस यामुळे तिने हे जगाला सिद्ध करून दाखवले होते की, ती सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करण्यास आली नाहीये. या चित्रपटाने तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. या नंतर तिने परत कधीच मागे वळून पाहिले नाही.
‘अंदाज’ आणि ‘एतराज’ या चित्रपटानंतर प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमारची जोडी ऑनस्क्रीन प्रेक्षकांना खूपच आवडू लागली होती. यानंतर देखील त्यांनी अनेक चित्रपटात काम केले, पण त्यांच्या वैयक्तिक नात्यावर प्रश्न उठवले जाऊ लागले होते. माध्यमातील वृत्तनुसार त्या दोघांचे अफेअर होते. हळूहळू ही बातमी अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिच्या कानावर पडली. ट्विंकल खन्ना ही देखील एक अभिनेत्री असल्याने, तिने सुरुवातीला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. परंतु तिचा राग तेव्हा बाहेर आला, जेव्हा अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा हे ‘वक्त’ या चित्रपटाची शूटिंग करत होते. तेव्हा ट्विंकलने अक्षयसाठी प्रियांकाच्या मोबाईलवर कॉल केला होता. पण त्यांची भांडण झाली. तेव्हा ट्विंकल रागारागात सेटवर गेली होती. पण तिथे प्रियांका चोप्रा नव्हती. तेव्हा तिच्यात आणि अक्षय कुमारमध्ये खूप जोरात भांडण झालं आणि तिने अक्षय कुमारला इथून पुढे प्रियांका चोप्रासोबत काम करण्यास मनाई घातली. त्यांनी ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात एकत्र काम केले होते, पण त्यानंतर त्यांनी एकत्र काम केले नाही.
या व्यतिरिक्त आणखी अनेक कलाकारासोबत प्रियांका चोप्राच्या अफेअरच्या बातम्या येत होत्या. अक्षय कुमारनंतर प्रियांका चोप्राचे नाव शाहरुख खानसोबत जोडले होते. ते दोघे ‘डॉन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान खूप जवळ आले होते. या सोबतच तिचे नाव शाहिद कपूर आणि हरमन बावेजासोबतही जोडले गेले होते.
प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्ये देखील तिचे चांगलेच नाव कमावले आहे. तिने २०१८ साली इंटरनॅशनल सिंगर निक जोनास याच्यासोबत थाटामाटात लग्न केले होते. त्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन पद्धतीने लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला अडीच वर्ष पूर्ण झाले आहे. ती निकसोबत अमेरिकेत राहते. ती आज बॉलिवूड बरोबरच हॉलिवूडमध्ये देखील एक आघाडीची नायिका आहे.
अधिक वाचा-
–सलमानच्या नावे फेक कॉल्स… भाईजानने दिला ‘हा’ थेट इशारा; वाचा काय घडले?
–दीपा चौधरी हिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा