Saturday, April 12, 2025
Home बॉलीवूड ‘अवतार 2’ने मारलं भारतीय बॉक्स ऑफिसचं मैदान, नुकत्याच हिट झालेल्या सिनेमाला पछाडत कमावले ‘एवढे’ कोटी

‘अवतार 2’ने मारलं भारतीय बॉक्स ऑफिसचं मैदान, नुकत्याच हिट झालेल्या सिनेमाला पछाडत कमावले ‘एवढे’ कोटी

सध्या जगभरातील बॉक्स ऑफिसवर एक सिनेमा जबरदस्त कमाई करत आहे. तो सिनेमा इतर कुठला नसून ‘अवतार: द वे ऑफ वॉटर‘ हा आहे. 16 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज झालेल्या जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार 2‘ सिनेमा 2022मधील सर्वात मोठा सिनेमा बनण्याच्या मार्गावर आहे. भारतातही या सिनेमाची जबरदस्त क्रेझ आहे. तसेच, शेवटच्या आठवड्यात भारतात कोणताही मोठा सिनेमा रिलीज न होण्याचा फायदा ‘अवतार 2’ सिनेमाला मिळाला आहे.

पहिल्या दिवशीच 40 कोटी रुपये कमावून जबरदस्त सुरुवात करणाऱ्या ‘अवतार 2’ (Avatar 2) तिसऱ्या आठवड्यातही शानदार कमाई करत आहे. वीकेंडमध्येही या सिनेमाने बक्कळ पैसा कमावला होता. मात्र, आठवड्यातील इतर दिवसांमध्येही सिनेमाला भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगला प्रेक्षकवर्ग भेटत आहे. ‘अवतार 2’ सिनेमाने काही नवीन विक्रमही रचले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avatar (@avatar)

बुधवारचे कलेक्शन
काही रिपोर्ट्सनुसार, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेला ‘अवतार 2’ सिनेमा जोरदार कमाई करत आहे. मंगळवारपर्यंत या सिनेमाने 345.9 कोटी रुपयांहून जास्त कमाई करणाऱ्या ‘अवतार 2’ने बुधवारी जवळपास 4 कोटींहून अधिक रुपये कमावले. यासोबतच भारतात ‘अवतार 2’ सिनेमाने एकूण 350 कोटींचा आकडादेखील पार केला आहे.

‘कांतारा’ सिनेमाला टाकले मागे
सन 2022 नुकतेच संपले आणि आता यादरम्यान रिलीज झालेल्या सिनेमांच्या यशाबद्दल बोलायचं झालं, तर ‘केजीएफ 2’ सिनेमाने सर्वाधिक कमाई केली. 2022मध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवर तिसरा सर्वात मोठा सिनेमा राहिलेला ‘कांतारा‘ (Kantara) सिनेमाने जवळपास 345 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता ‘अवतार 2’ सिनेमाने या कमाईलादेखील मागे टाकले आहे. तसेच, ‘अवतार 2’ हा 2022मधील तिसरा मोठा सिनेमा बनला आहे.

भारतीय बॉक्स ऑफिसवर मागील वर्षी सर्वाधिक कमाई करणारे 5 सिनेमे
केजीएफ 2- 950 कोटींहून अधिक
आरआरआर- 900 कोटींहून अधिक
अवतार 2 – 350 कोटी* (अद्याप चित्रपटगृहात)
कांतारा- 345 कोटींहून अधिक
ब्रह्मस्त्र 1- 269 कोटींहून अधिक

आतापर्यंत ‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’ हा भारतातील सर्वात मोठा हॉलिवूड सिनेमा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 373 कोटी रुपये कमावले होते. मात्र, आता असे म्हटले जात आहे की, ‘अवतार 2’ सिनेमा हा विक्रमदेखील मोडून भारतातील सर्वात मोठा हॉलिवूड सिनेमा बनेल. (hollywood movie avatar 2 box office beats kantara in india)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘शार्क टँक इंडिया’ची जज आहे ‘एवढ्या’ कोटींची मालकीण; वर्षाकाठी कमावते पैसाच पैसा
सलमानने मिठीत घेताच घाबरलेली अभिनेत्री, भाग्यश्रीने 3 तास फोडलेला हंबरडा; शेवटी थेट डिरेक्टरला…

हे देखील वाचा