Saturday, April 20, 2024

रिषभच्या ‘कांतारा’चा नादच खुळा! बक्कळ कमाईनंतर आता ‘हे’ गाणेही ठरले सुपरहिट; युट्यूबवर 5 कोटी हिट्स

मागील वर्षी सप्टेंबर 2022मध्ये कांतारा‘ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाच्या कहाणी आणि मांडणीने अशी काही जादू केली की, अवघ्या 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने तब्बल 400 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. या सिनेमाने हिंदी पट्ट्यातही आपला जलवा दाखवला आहे. या सिनेमाने विक्रम रचले आहेतच, पण आता या सिनेमाबाबत आणखी एक बातमी येत आहे. ती अशी की, या सिनेमाच्या गाण्यानेही विक्रम रचला आहे.

‘कांतारा’ (Kantara) सिनेमातील ‘वराह रूपम’ (Varah Roopam) हे गाणे युट्यूबवर गाजत आहे. विशेष म्हणजे, या गाण्याने युट्यूबच्या 2022मधील टॉप गाण्यांमध्ये स्थान मिळवले आहे. या गाण्याला आतापर्यंत 52 मिलियनहून अधिक म्हणजेच जवळपास 5 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याची सर्वात मोठी खासियत संगीत आहे. या संगीतात किनारी प्रदेशातील सुरांचा समावेश केला आहे. यासोबतच गिटार, व्हायोलिन आणि कीबोर्डसह केलेली जुगलबंदी विशेष बनवते.

अजनीश लोकनाथ यांनी केले संगीतबद्ध
‘वराह रूपम’ या गाण्यात प्रादेशिक श्रद्धा अतिशय सुंदरपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्याचे संगीत वेगवान असून लक्ष वेधणारे आहे. हे गाणे बी. अजनीश लोकनाथ यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच, या गाण्याला साई विग्नेश याने आपला आवाज दिला आहे. रिषभ शेट्टी (Rishabh Shetty) याच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्याची ही थीम एकदम वेगळी आहे, जी लोकांचे लक्ष वेधत आहे.

आधी चोरीचा आरोप, नंतर मिळाली क्लीन चीट
ज्यावेळी हे गाणे रिलीज झाले, तेव्हा या गाण्यावर एका प्रसिद्ध बँडने चोराचा आरोप लावला होता. बँडचा असा आरोप होता की, निर्मात्यांनी त्यांना विचारल्याशिवाय गाण्याचे सूर चोरले आहेत, जे मूळ त्यांचे होते. याप्रकरणी दोन न्यायालयात खटले दाखल झाले होते. पुराव्यांसह निर्मात्यांनी दोन्ही प्रकरणात विजय मिळवला. तसेच, न्यायालयाने हे प्रकरण रद्द केले. यानंतर दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टी याने ट्वीट करत आनंद व्यक्त केला होता. (actor rishab shetty kantara varah roopam trending on youtube with 46 million views)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वरुणने वाघासोबत, तर अनुष्काने कुटुंबासोबत म्हटले 2022ला बायबाय, पाहा कलाकारांच्या हटके पोस्ट
आता बॉक्स ऑफिस हादरणार! 2023मध्ये पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार ‘या’ जोड्या, यादी पाहाच

हे देखील वाचा