गेल्या एक वर्षापासून उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देशावर मोठे संकट आहे. मोठ-मोठे उद्योग व छोट्या-मोठ्या कंपन्या बंद असल्यामुळे शासनाच्या उत्पादनावर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर झाला आहे. देश सध्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. रुग्णांलयांमध्ये बेड, ऑक्सिजन व उपाचारासाठी लागणाऱ्या साधनांची कमतरता असल्याच्या बातम्या रोज ऐकाला मिळत आहेत. देशातील सर्व व्यवहार ठप्प असताना देशाला आर्थिक मदतीची गरज आहे. भारतात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, गायिका कॅमिला कॅबेलोने जगभारातील नागरिकांना भारताची मदत करण्याचे आवाहन केले होते.
तिने कोव्हिड योद्ध्यांसाठी भारतामध्ये पैसे दान करण्याचे आणि जनजागृती पसरवण्याचे आवाहन करणारे व्हिडिओ संदेशही जारी केले होते. आपला आगामी चित्रपट ‘सिंड्रेला’चे प्रमोशन करताना कॅमिला म्हणाली, संकटकाळात भारताला मदत करताना तिला खूप आनंद वाटत होता. इतकेच नव्हे, तर तिने बॉयफ्रेंड शॉन मेंडिससोबत भारतात फिरण्याचे नियोजनही केले होते.
ती म्हणते, “शॉन आणि माझे मित्र जय आणि राधी शेट्टी यांनी निधी गोळा करायला सुरुवात केली. आम्ही त्याला पाठिंबा दिला. कारण, मला त्याची पोस्ट आवडली. मला वाटते की, भारतातून बरीच अध्यात्म आणि पद्धती आपल्याला मिळाल्या आहेत, ज्या आपण शिकलो आणि त्यांच्याशी जुळवून घेतले. म्हणूनच शाॅन आणि मी बराच काळ भारतात जाण्याबद्दल बोलत होतो. जोपर्यंत आपण जगातील कोरोनाच्या दरम्यान सुरक्षित आहोत, तोपर्यंत आम्हाला हे सर्व करायला आवडेल.”
‘फिफ्थ हार्मनी’ या बँडने प्रसिद्धी मिळवलेली एक दिग्गज गायिका आता एक जागतिक स्टार आहे. ‘हवाना’ आणि ‘सेनोरिटा’ सारख्या गाण्यांमुळे ती जगभरात प्रसिद्ध झाली होती. कॅमिला २४ वर्षांची आहे, जी क्युबामध्ये जन्मलेली अमेरिकन गायिका आहे. आता ती ‘सिंड्रेला’ चित्रपटाद्वारे अभिनयविश्वात पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक के कॅनन आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सोनम कपूरने धोती आणि कुर्ता अशी केली पुरुषी वेशभूषा, वडील अनिल कपूर यांनी दिली प्रतिक्रिया
-‘बिग बॉस ओटीटी’वर निया शर्माचा जलवा; ‘वाईल्ड कार्ड’ म्हणून करणार एन्ट्री