Friday, November 22, 2024
Home हॉलीवूड भारताच्या मदतीला हॉलिवूड कलाकार! गायिका कॅमिला अन् कॅटी पेरीचे चाहत्यांना आवाहन, म्हणाल्या…

भारताच्या मदतीला हॉलिवूड कलाकार! गायिका कॅमिला अन् कॅटी पेरीचे चाहत्यांना आवाहन, म्हणाल्या…

कोरोनामुळे भारत देशाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. मृत्यूचे तांडव सगळीकडे बघायला मिळात आहे. संकटाच्या या काळात प्रत्येकजण एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे येत आहे, आणि अशा परिस्थितीत बॉलिवूडचे कलाकारही, लोकांपर्यंत मदत पोहोचत आहेत. सोनू सूद, अक्षय कुमार, आलिया भट्ट यांसारखे अनेक कलाकार मदतीकरता धावून आले आहेत. कोरोनाची साथ भारतात तीव्रतेने पसरत आहे, आणि भारतीय सातत्याने याला झुंज देत आहेत. आता या कार्यामध्ये हॉलिवूड गायकांचेही नाव जोडले गेले आहे. अलीकडेच हॉलिवूड गायिका कॅटी पेरी आणि कॅमिला कॅबेलो यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून, चाहत्यांना मदत करण्याची विनंती केली आहे.

कॅटी पेरीने तिच्या चाहत्यांना आवाहन केले आहे की, कोरोना संसर्गाविरूद्ध भारताला मदत करण्यासाठी हातभार लावावा. आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना तिने लिहिले की, ‘तुम्ही भारतातील कोरोनाच्या कहरबद्दल ऐकले असेलच. दररोज कोरोनाच्या रूग्णांची संख्या एक नवीन विश्वविक्रम निर्माण करत आहे. एनपीआरच्या अहवालानुसार, भारतामध्ये ३,८६,४५३  प्रकरणांची नोंद झाली आहे. ऑक्सिजनसह जीवनावश्यक वस्तू, आणि उपकरणांचा तुटवडा जाणवल्याने रूग्णालयांमधली भरती थांबली आहे. कारण त्यांना ऑक्सिजनसह जीवनावश्यक वस्तू, आणि उपकरणांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे लोकांना आपल्या माणसांना रुग्णालयाच्या दाराबाहेरील स्ट्रेचरवर मरत असल्याचे पाहावे लागत आहे.’

गायिकेने पुढे ब्रिटीश एशियन ट्रस्टला टॅग केले आणि लिहिले आहे, “माझे मित्र भारतातील रूग्णालयात ऑक्सिजन एकत्रीकरण केंद्र, भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही मदत करण्याचा विचार करा. आपण मदत करू इच्छित असल्यास, लिंक माझ्या बायोमध्ये आहे.”

तर गायिका कॅमिला कॅबेलोने, तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला, आणि कोरोना साथीच्या आजारामुळे भारतातील परिस्थितीबद्दल दुःख व्यक्त केले. कॅमिलाने काहींना कॅप्शनमध्ये टॅग केले होते, “भारत कोरोना संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत आहे. ज्यामुळे भारत वाचविण्यासाठी, मदतीकरता संसाधने व मदतीची नितांत आवश्यकता आहे.”

गायिकेने पुढे असे लिहिले की, “ज्यांना शक्य असेल, त्यांनी कृपया जय शेट्टी, आणि राधिदेव यांच्याशी संपर्क साधा. ते भारताला मदत करण्यासाठी दहा लाख डॉलर्स, जमा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपली मदत परिस्थिती बदलू शकते. त्यासाठी प्रयत्न करा. देणगी देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोनापुढे अभिनेत्री असहाय्य! वडिलांच्या मृत्यूनंतर आता हिना खानने आईसाठी लिहिली भावुक पोस्ट, म्हणाली…

-‘तू वनराजचा पिच्छा का सोडत नाहीये?’ मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्माच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न

-पंजाबवरून परतल्यानंतर अभिनवला समजले पत्नी रुबीनाच्या कोरोना चाचणीबाबत, म्हणाला ‘तिच्याकडे जाऊन काहीच फायदा होणार नाही’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा