पंजाबवरून परतल्यानंतर अभिनवला समजले पत्नी रुबीनाच्या कोरोना चाचणीबाबत, म्हणाला ‘तिच्याकडे जाऊन काहीच फायदा होणार नाही’

Rubina Dilaik did not tell her husband that she is corona positive


कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. मागच्या वर्षीपेक्षा मृत्यूदर देखील वाढला आहे. त्यामुळे सगळीकडे भयाण वातावरण निर्माण झाले आहे. चित्रपटसृष्टीवर देखील याचा भयानक परिणाम झाला आहे. अनेक बॉलिवूड कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. काहींनी तर आपला जीव देखील गमावला आहे. अशातच बिग बॉस 14 ची विजेती स्पर्धक रुबीना दिलैक हिला काही दिवसांपूर्वी‌ कोरोनाची लागण झाली होती. सोशल मीडियावर तिने ही माहिती दिली होती. परंतु या सगळ्याची माहिती तिने तिचा पती अभिनव शुक्ला याला दिली नव्हती.

अभिनव शुक्ला नुकताच पंजाबवरून मुंबईला आला आहे. इकडे आल्यावर त्याला या गोष्टीची माहिती समजली की, रुबीनाला कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत अभिनवने सांगितले होते की, “रुबीना आता शिमलामध्ये आहे आणि ती आता ठीक आहे. मी जरी तिथे गेलो तरीही मला तिला भेटता येणार नाही, त्यामुळे तिथे जाऊन काहीही फायदा होणार नाही.”

अभिनव शुक्लाने पुढे सांगितले की, “अशा वेळेत आपल्याला घाबरून चालणार नाही. आपल्याला आता हा विचार केला पाहिजे की, आपण या संकटातून बाहेर कसे पडू शकतो. जर आपण घाबरलो, तर आपल्या कुटुंबातील मंडळी देखील घाबरतील. त्यामुळे आता आपल्याला हिमतीने काम करायला पाहिजे. रूबीना सगळ्या नियमांचे पालन करत आहे. मला आशा आहे की, ती लवकरच ठीक होईल.”

कोरोनाची लागण झाल्यावर रुबीनाने इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती की, “मी नेहमीच सकारात्मक दृष्टीने विचार करते. मी देखील आता एक महिन्यानंतर प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पात्र ठरेल. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पुढचे 17 दिवस मी गृहविलगीकरणात असणार आहे. तरीही जे कोणी मागील 5-7 दिवसात माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी त्यांची चाचणी करून घ्या.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले मिलिंद सोमण; प्लाझ्मा दान करण्यासाठी करतायत जोरदार व्यायाम, पाहा व्हिडिओ

-खरंच! ‘मी दिशाला किस केले नाही’, असं का म्हणाला सलमान खान? पाहा बिहाईंड द सीन्स व्हिडिओ

-कोव्हिड पॉझिटिव्ह अभिनेता अनिरुद्ध दवेची प्रकृती गंभीर; पत्नीने फोटो शेअर केली भावुक पोस्ट, वाचून तुमचेही डोळे पाणावतील


Leave A Reply

Your email address will not be published.