कोरोनापुढे अभिनेत्री असहाय्य! वडिलांच्या मृत्यूनंतर आता हिना खानने आईसाठी लिहिली भावुक पोस्ट, म्हणाली…


सगळीकडेच कोरोनामुळे वाईट अवस्था आहे, कित्येक लोक या कोरोनाच्या विखळ्यात अडकले आहेत. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान हिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तिने स्वतःला घरातच आयसोलेट करून घेतले आहे. तिच्यासाठी आता सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, तिच्या वडिलांच्या निधनानंतर, तिला या कठीण परिस्थितीत आईबरोबर दुःख वाटणे शक्य होत नाहीये. हिनाने असहाय्यतेची व्यथा सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करुन शेअर केली आहे.

या छायाचित्रांमध्ये हिना खान खोलीच्या आतमध्ये मास्क घातलेली दिसली आहे. तिने लिहिले की, ‘एक असहाय्य मुलगी, जी अत्यंत गरजेच्या वेळी आपल्या आईला सांत्वन देऊ शकत नाही. प्रिय मित्रांनो, ही वेळ फक्त आपल्यासाठीच नाही, तर सर्व लोकांसाठीसुद्धा कठीण आहे. पण एक म्हण आहे की, कठीण काळ टिकत नाही. कठोर लोक करतात. आणि मी आहे, होते, आणि नेहमीच माझ्या वडिलांची मजबूत मुलगी राहील. आपल्या प्रार्थना पाठवा, प्रकाश पसरवा. प्रार्थना. ‘

हिना खानच्या या पोस्टवर, गौहर खानने लिहिले, ‘देव तुझे भले करो.’ त्याचवेळी प्रियांक शर्मा, अर्जुन बिजलानी, टीना दत्ता, नुपूर सेनन, कुशल टंडन, देबोलीना भट्टाचार्य, रश्मी देसाई, मौनी रॉय, भारती सिंग, रुबीना दिलैक, महिमा चौधरी, गीता फोगट यांच्यासह अनेक नामांकित व्यक्तींनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचवेळी हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालने हार्ट ईमोजी पाठवला आहे. हिना खानच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले होते. त्यावेळी काश्मीरमध्ये शाहीर शेखसोबत तिच्या नव्या प्रोजेक्टचे शूटिंग होते.

हिनाच्या वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच, ती त्वरित मुंबईला परतली होती. त्यानंतरच तिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याबाबत तिने इंन्स्टाग्रामवर पोस्ट करून माहिती दिली होती. तिने पोस्टमध्ये लिहिले, ‘माझ्यासाठी, आणि माझ्या कुटुंबासाठी हा एक अतिशय कठीण, आणि आव्हानात्मक काळ आहे, मी कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आहे, आणि सर्व आवश्यक खबरदारी घेत आहे.’

हिनाने पुढे लिहिले, ‘जो माझ्या संपर्कात आला आहे, कृपया त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. मला तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनाची गरज आहे. सुरक्षित राहा, आणि आपली काळजी घ्या.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पंजाबवरून परतल्यानंतर अभिनवला समजले पत्नी रुबीनाच्या कोरोना चाचणीबाबत, म्हणाला ‘तिच्याकडे जाऊन काहीच फायदा होणार नाही’

-‘तू वनराजचा पिच्छा का सोडत नाहीये?’ मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्माच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न

-‘दिलबर गर्ल’ नोहा फतेहीकडून चाहत्यांना डान्सचे धडे; पाहा धमाकेदार स्टेप्स


Leave A Reply

Your email address will not be published.