Saturday, June 21, 2025
Home नक्की वाचा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कलाकार आता दिसतात असे, ओळखणेही झालंय कठीण

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कलाकार आता दिसतात असे, ओळखणेही झालंय कठीण

जुने मूव्हीज जर पाहिले, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की, यात मनोरंजनाचा तडका कोणी लावत असतील, तर ते निगेटिव्ह कॅरेक्टरच होते. ते आपल्या कोणत्या ना कोणत्या कटकारस्थानाने सिनेमामध्ये जीव ओतायचे. त्यामुळे एकप्रकारे प्रेक्षकांना सिनेमा अर्धवट सोडण्याची वेळच येत नव्हती. असे रोल साकारून भलेही त्यांना सिनेरसिकांचं प्रेम मिळत नव्हतं, पण त्यांच्या ऍक्टिंगमुळे त्यांची चोहोबाजूंनी प्रशंसाच प्रशंसा व्हायची. आजच्या या लेखात आपण त्या कलाकारांच्या पार्टनर आणि मुलाबाळांबद्दल तसेच आज ते कसे दिसतात हे जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया…

जयसुधा
जयसुधा यांनी बॉलिवूडमधल्या ‘आईना’ आणि ‘जख्मी शेर’ यांसारख्या सिनेमात काम केलंय. जयसुधांनी आपल्या वयाची साठी ओलांडलीये. त्यामुळे आधी सडपातळ असणाऱ्या जयसुधा आज थोड्या जाड झाल्या असून त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसू लागल्या आहेत. पण असं असूनही त्या सुंदर दिसतायत. त्यांच्या पार्टनर आणि मुलाबाळांबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी १९८५ साली सुपरस्टार जीतेंद्र यांचा भाऊ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन कपूर यांच्यासोबत संसार थाटला होता. त्यांना २ मुले असून त्यांची नावे श्रेयन आणि निहार कपूर आहेत. दुर्दैवानं २०१७ साली नितीन कपूर यांचं निधन झालं होतं.

आशुतोष राणा
आपल्या भयानक रोलने नेहमीच प्रेक्षकांचा थरकाप उडवणाऱ्या आशुतोष राणांचाही या यादीत समावेश आहे. त्यांनी ‘गुप्त’ आणि ‘संघर्ष’सारख्या सिनेमात आपल्या निगेटिव्ह ऍक्टिंगचा जलवा दाखवलाय. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर ते सध्या ५४ वर्षांचे आहेत. पण आजही ते पूर्वीसारखेच दिसतायत. पण त्यांच्या स्टाईलमध्ये जरा बदल पाहायला मिळतोय. ते अलीकडे कुर्ता अन् पायजमामध्ये दिसतात. करिअरबद्दल बोलायचं झालं, तर इतकी वर्षे उलटून गेली, तरीही त्यांचं अभिनयातील करिअर आजही सुरूच आहे. ते लवकरच पृथ्वीराज सिनेमात झळकणार आहेत. त्यांच्या पत्नी आणि मुलाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी २००१ साली अभिनेत्री रेणुका शहाणेसोबत लग्न केले होते. त्यांना २ मुलंही आहेत. त्यांची नावं शौर्यमन आणि सत्येंद्र अशी आहेत. ही दोन्ही मुलं अजून लहान असून आपल्या शिक्षणावर लक्ष देत आहेत.

हिमानी शिवपुरी
नव्वदच्या दशकात हिमानी शिवपुरी यांनी पॉझिटिव्हसोबतच निगेटिव्ह रोलही साकारलेत. त्या अनेक सुपरस्टारच्या सिनेमात दिसल्या आहेत. जसे की, ‘मैं प्रेम की दीवानी हूँ’, ‘मेहंदी’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ आणि असे बरेच. हिमानी शिपपुरी या ६१ वर्षांच्या आहेत. वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील पूर्वीसारखा चमकपणा कमी झालाय आणि सुरकुत्या दिसतायत. पण असं असलं तरी अभिनयाचं खुळ मात्र त्यांच्या डोक्यातून जात नाहीये. त्या आजही सिनेमासोबतच मालिकेतही दिसतात. त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी ग्यान शिवपुरींसोबत लग्न केलं होतं. पण लग्नानंतर काही वर्षांनीच त्यांचं १९९५ साली निधन झालं. आज त्या आपला मुलगा कट्यायान शिवपुरीसोबत मुंबईत राहतात. त्यांचा मुलगा खूप मोठा झालाय. तो दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये काम करतोय.

रंभा
सलमान खान, प्रभू देवा, गोविंदा, अजय देवगण, मिथून यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करून सिनेविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे रंभा. आज ती ४५ वर्षांची झालीय. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत. आणि तिचं वजनही जरा वाढलंय. पण असं असूनही ती आजही सुंदर दिसतेय. तिने २०१० साली बिझनेसमन इंधरनसोबत लग्न केलं असून त्यांना तीन मुलंही आहेत. त्यात मुली लावण्या, साशा आणि एक मुलगा शिवीन आहे. करिअरला पूर्णविराम लावत रंभा आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहे.

हेही पाहा- नकारात्मक भुमिकांनी पडदा गाजवणारे ‘हे’ कलाकार आज नेमकं काय करतायेत?

मुकेश ऋषी
बऱ्याच प्रेक्षकांना या अभिनेत्यांचं नाव माहिती नसेल, पण ‘जफर सुपारी’ म्हणलं की, या अभिनेत्यांचा चेहरा लगेच सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. आणि महत्त्वाचं निगेटिव्ह रोलने प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या कलाकाराची चर्चा होत असेल, तर त्यात मुकेश रिशींचं नाव येणार नाही, असं मुळीच होणार नाही. मुकेश यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर ते आज ६५ वर्षांचे झालेत. इतकी वर्षे इंडस्ट्रीत काम करणाऱ्या मुकेश यांच्या चेहऱ्यात थोडासा बदल दिसतोय. पण त्यांचा फिटनेस मात्र एकदम जबरदस्त आहे. आपल्या स्टाईलमुळे ते आणखीच हँडसम दिसतात. मुंबईत राहणाऱ्या या अभिनेत्यांनी आजही आपले करिअर टिकवून ठेवलंय. त्यांच्या कुटुंबाविषयी बोलायचं झालं, तर त्यांच्या पत्नीचं नाव केशनी आहे. त्या सध्या आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. त्यांना दोन मुलंही आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव राघव असून तो अभिनेता आहे, तर त्यांची मुलगी अजून छोटी असून ती शिक्षण घेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

लग्नानंतरही किसींग सीन देणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री, यादीत ऐश्वर्याचाही समावेश

‘शूट आऊट ऍट वडाला’च्या डायरेक्टरने खाल्ली होती विवेक ओबेरॉयसोबत काम न करण्याची शपथ

मोठी बातमी! कपिल शर्माला मिळाली ७ वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची शिक्षा, अमेरिकेत झालाय गुन्हा दाखल

हे देखील वाचा