Sunday, December 8, 2024
Home नक्की वाचा लग्नानंतरही किसींग सीन देणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री, यादीत ऐश्वर्याचाही समावेश

लग्नानंतरही किसींग सीन देणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री, यादीत ऐश्वर्याचाही समावेश

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री होऊन गेल्या, आणि आहेत, ज्यांनी लग्नानंतर सिनेसृष्टीला रामराम ठोकला. जसे की, नम्रता शिरोडकर, असीन, सोनाली बेंद्रे, ट्विंकल खन्ना आणि अशाच काही, पण अशाही काही अभिनेत्रींनी आहेत, ज्यांनी लग्नानंतर काही महिन्यांनी लगेच पुनरागमन केले आणि इंटिमेट सीन, किसींग सीन देत आहेत. कोणत्या आहेत त्या अभिनेत्री जाणून घेऊया या लेखातून.

ऐश्वर्या राय बच्चन
ऐश्वर्या म्हणजे अनेकांच्या मनावर राज्य करणारी स्वप्नसुंदरी. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मोहब्बतें’, ‘देवदास’ यांसारख्या सिनेमात तिनं आपल्या सहजसुंदर अभिनयाने सर्वांनाच भुरळ घातली. त्यानंतर तिनं २० एप्रिल, २००७ रोजी प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चनसोबत साताजन्मानची गाठ बांधत लग्न केलं. सर्वांनाच वाटलं की, लग्नानंतर आता ऐश्वर्या काय सिनेमात परत येत नसते, पण या सर्व चर्चांना पूर्णविराम लावत ऐश्वर्या सिनेमात परतली. एवढ्या मोठ्या बच्चन कुटुंबाची सून आणि एका मुलीची आई म्हणल्यावर ती सिनेमात इंटिमेट सीन किंवा किसींग सीन देणार नाही असंही सर्वांना वाटलं, पण तिने २०१६ साली आलेल्या ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमात अभिनेता रणबीर कपूरसोबत किसींग सीन दिले. या किसींग सीनची चांगलीच चर्चा रंगली होती.

करीना कपूर
करीनानं १६ ऑक्टोबर, २०१२ रोजी अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केलं. लग्नाआधी तिनं शाहिद कपूर, अक्षय कुमार, फरदीन खान आणि सैफ अली खान यांच्यासोबत किसींग सीन दिला होता. पण जेव्हा तिचं लग्न झालं, तेव्हा ती रुपेरी पडद्यावर काम करणार नाही किसींग सीन देणार नाही असं तिच्या चाहत्यांना वाटलं, पण घडलं भलतंच. तिनं २०१६ साली आलेल्या ‘की अँड का’ या सिनेमात अर्जुन कपूरसोबत लिपलॉक सीन दिला होता. करीना सध्या २ मुलांची आई आहे. तिच्या मुलांचं नाव तैमूर आणि जेह आहे.

अनुष्का शर्मा
अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर आपलं नाव बनवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अनुष्का शर्माचं नाव घेतलं जातं. आज तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. १५ एक सिनेमात झळकल्यानंतर तिनं भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबत १७ डिसेंबर, २०१७ रोजी लग्नाची गाठ बांधली होती. अनेक अभिनेत्री लग्नानंतर आपल्या कुटुंबाला महत्त्व देतात आणि सिनेसृष्टीकडं वळूनही पाहत नाहीत. पण अनुष्काच्या बाबतीत जरा वेगळंय. तिने लग्नानंतरही पडद्यावर पुनरागमन केलं आणि किसींग सीनही दिले. तिनं २०१८ साली रिलीझ झालेल्या ‘झिरो’ या सिनेमात सुपरस्टार शाहरुख खानसोबत किसींग सीन दिला होता.

राधिका आपटे
अनेक चाहत्यांना माहिती नसेल की, मराठी आणि हिंदी सिनेमात झळकलेली अभिनेत्री राधिका आपटेचंही लग्न झालंय. २०१२ साली ब्रिटीश आर्टिस्ट असलेल्या बेनेडिक्ट टेलरसोबत तिने लग्न केलंय. विशेष म्हणजे राधिकाने लग्नानंतर अनेक सिनेमात किसींग सीन दिले आहेत. त्यात ‘कौन कितने पानी मैं’, ‘पार्च’, ‘द वेडिंग गेस्ट’, ‘बाजार’, ‘बदलापूर’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘अंधाधून’ सिनेमातही अभिनेता आयुष्मान खुरानासोबत इंटिमेट आणि किसींग सीन दिले आहेत.

माधुरी दीक्षित
‘धकधक गर्ल’ म्हणून जगात ख्याती असलेली बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचाही या यादीत समावेश आहे. तिने लग्नाआधा अनेक सिनेमात इंटिमेट सीन दिले आहेत. मात्र, १७ ऑक्टोबर, १९९९ रोजी डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर तिने सिनेमात इंटिमेट सीन देणं बंद केलं. पण माधुरीने मीडियाशी बोलताना सांगितलंय की, जर स्क्रिप्टमध्ये किसींग सीनची मागणी असेल, तर ती असे सीन देऊ शकते. माधुरीला दोन मुलांची आई असून अरिन आणि रायन अशी त्यांची नावे आहेत.

हेही पाहा- लग्नानंतरही किसींग देण्यास हयगय न करणाऱ्या अभिनेत्री

दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोणनं १४ नोव्हेंबर, २०१८ अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नाची गाठ बांधली होती. लग्नापूर्वी तिनं अनेक सिनेमात किसींग सीन दिले आहेत. पण लग्न झाल्यानंतरही ती इंटिमेट आणि किसींग सीन अजूनही देत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘गेहराईयां’ या सिनेमात तिनं अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत किसींग सीन दिले होते. यानंतर रणवीर सिंगनेही प्रतिक्रिया दिली होती, ज्याने सर्वांनाच शॉक बसला. सर्वांना वाटलं होतं की, रणवीर वेगळ्या पद्धतीने रिऍक्ट होईल, पण तो तिच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला होता की, ‘मूडी, सेक्सी बेबी गर्ल.’ यावरून समजतं की, रणवीर आणि दीपिका यांच्यात पारदर्शक नातं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘शूट आऊट ऍट वडाला’च्या डायरेक्टरने खाल्ली होती विवेक ओबेरॉयसोबत काम न करण्याची शपथ

मोठी बातमी! कपिल शर्माला मिळाली ७ वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची शिक्षा, अमेरिकेत झालाय गुन्हा दाखल

‘जबरे पिया’ गाण्यावर बेभान होऊन नाचली रश्मी देसाई, सुंदरता पाहून नजरच हटणार नाही

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा