आपण ऐकत आणि पाहत आलोय की, पंक्चरच्या दुकानात काम करणारा मुलगा पुढं जाऊन कलेक्टर बनला, बस कंडक्टरचं काम करणारा व्यक्ती पुढं जाऊन स्टार झाला, आणि असे बरेच. यामध्ये आणखी एका गोष्टीचा समावेश होतो ते म्हणजे, रस्त्यावर सिगारेट विकणारा मुलगा पुढं जाऊन बॉलिवूडचा सुपरस्टार झाला. होय तुम्ही म्हणाल ही का उदाहरणं देतेय?? तर असंच काहीसं आहे बॉलिवूडच्या या अभिनेत्याचं. ज्याला रस्त्यावर सिगारेट विकताना पाहून खुद्द दिग्गज अभिनेते देव आनंद यांनी सिनेमात काम करण्याची ऑफर दिली होती. अजूनही तुमच्या लक्षात आलं नसेल, तर ते अभिनेते म्हणजेच आपल्या सर्वांचे जग्गू दादा म्हणजेच जॅकी श्रॉफ. जाणून घेऊया रस्त्यावर सिगारेट विकणारे जॅकी श्रॉफ कशाप्रकारे सुपरस्टार बनले.
जॅकी यांचा जन्म १ फेब्रुवारी, १९५७ मध्ये एका गुजराती परिवारात झाला होता. त्यांचे संपूर्ण आणि खरे नाव म्हणजे आहे जयकिशन कटुभाई श्रॉफ. त्यांचे संपूर्ण बालपण मुंबईमधील वाळकेश्वर परिसरातील एका चाळीत अतिशय गरिबीत गेले. याच गरिबीमुळे त्यांना त्यांचे शिक्षण देखील सोडावे लागले होते. याच अपुऱ्या शिक्षणामुळे त्यांना हा जॉब नाकारला गेला. घरखर्च भागवण्यासाठी जग्गू दादा यांना काम करणे खूपच आवश्यक होते. त्यामुळे ते सतत वेगवगेळ्या ठिकाणी नोकरी शोधत होते.
View this post on Instagram
ताजमधली नोकरी नाकारल्यानंतर त्यांनी एअर इंडियामध्ये फ्लाईट अटेंडंटच्या नोकरीसाठी देखील अर्ज केला होता, पण तिथेही त्यांना नोकरी मिळाली नाही.
काम मिळवण्यासाठी जग्गू दादा मुंबईमध्ये खूप फिरायचे. अनेक ठिकाणी त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले होते. एकदा एका बस स्टॉप उभे होते, अचानक त्यांना तिथून जाणारे सुपरस्टार देव आनंद यांनी पाहिलं होतं. देव आनंद यांना जॅकी यांच्या डोळ्यात ती चमक दिसली होती. देव आनंद यांनी ‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या एका मुलाखतीत ते जॅकी श्रॉफला कसे भेटले हे सांगितले होते. देव साहेबांनी सांगितलं होतं की, “एकदा ते त्यांच्या गाडीतून रस्त्यावरून जात होते. त्यांना रस्त्यावर एक घाणेरडा शर्ट आणि फाटलेली जीन्स घातलेला मुलगा चारमिनार सिगारेट विकताना दिसला. त्या मुलाच्या डोळ्यात असे काही दिसले की, त्याला त्यांच्या सिमेमात घ्यायचे होते.” त्याचंही नशीब असं की, देव साहेब त्यांच्या कार्यालयात पोहोचताच, त्यांना तो मुलगा तिथे दिसला. देव साहेबांनी लगेचच त्यांच्या ‘स्वामी दादा’ सिनेमात जॅकी श्रॉफ यांना कास्ट केले. सिनेमा आला आणि गेला, कुणालाही कानोकान खबर झाली नाही. कारण देव आनंद यांचा सिनेमा प्रमोशनसारख्या कोणत्याही रणनीतीवर विश्वास नव्हता. या सिनेमासोबतच जॅकी मॉडेलिंगही करत होता.
View this post on Instagram
जॅकी पहिल्यांदा कोणत्या सिनेमात दिसले असतील, तर ते म्हणजे १९८२ मध्ये आलेल्या ‘स्वामी दादा’मध्ये. या सिनेमात त्यांनी देव आनंद यांच्यासोबत काम केलं होतं. या सिनेमात ते १० मिनिटे हिटमॅनच्या भूमिकेत दिसले होते.
बॉलिवूडमध्ये केलेल्या अफलातून कामासाठी राज कपूर यांच्यानंतर दिग्दर्शक सुभाष घई यांना ‘शोमॅन’ म्हणलं गेलंय. दिग्दर्शक म्हणून त्यांचे सुरुवातीचे १५ पैकी १२ सिनेमे सुपरहिट ठरले होते. १९७६ पासून सुरू झालेलं त्यांचं करिअर जर मध्येच ‘कर्ज’ आणि ‘क्रोधी’ यांसारखे सिनेमे आले नसते, तर असंच चालत राहिलं असतं. ‘कर्ज’ हा घई यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. मात्र, सिनेमा खास कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर घई सावध झाले. ते दिलीप कुमार आणि संजय दत्त यांच्यासोबत सिनेमा बनवत होते. सोबतच आणखी एका स्क्रिप्टवर काम करत होते. सिनेमाचं नाव होतं ‘संगीत’, पण या सिनेमाच्या कास्टवरून ते चांगलेच चिंतेत होते. कारण त्यावेळी त्यांना संजय दत्तसोबत हा सिनेमा बनवायचा होता, पण संजय दत्तचं ड्रग्ज ऍडिक्शनचा काळ होता. यानंतर त्यांनी कमल हासन यांना कास्ट करण्याचा विचार केला, पण तोही प्लॅन फसला. कारण ते सुपरस्टार असल्याने त्यांच्याकडे या सिनेमासाठी वेळच नव्हता.
View this post on Instagram
आता घई यांनी हा सिनेमा ड्रॉप करत ठरवलं होतं की, दुसरा प्रोजेक्ट सुरू करायचा. नवीन चेहऱ्यांसोबत छोट्या बजेटचा सिनेमा बनवायचा. असे म्हटले जाते की, घई यांनी त्या सिनेमाचं नाव बदलून ‘संगीत’वरून ‘हिरो’ ठेवलं. तसेच ‘मुक्ता आर्ट्स’ नावाने आपले प्रोडक्शन हाऊस सरू केले. तसेच त्यांनी नवीन चेहऱ्यांना कास्ट करून नवीन सिनेमा बनवला. सिनेमा होता ‘हिरो.’ १६ डिसेंबर, १९८३ रोजी रिलीझ झालेला हा सिनेमा सुपरहिट ठरला. तब्बल ७५ आठवडे हा सिनेमा थिएटरमध्ये चालला होता. या सिनेमाने रस्त्यावर सिगारेट विकणाऱ्या मुलाला स्टार बनवले होते. तसेच सिनेसृष्टी सोडणारी मुलगी बनली निर्मात्यांची पहिली पसंत. नाव होतं जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री.
जेव्हा सुभाष घईंनी ‘संगीत’ची कल्पना सोडली, तेव्हा ते ‘हिरो’साठी हिरोच्या शोधात होते. त्यांना जॅकींबद्दल समजलं. त्यांनी हा मुलगा बिनधास्त जगताना पाहिला होता. वाढलेली दाढी-मिशी, विचित्र कपडे घातलेले, पण जेव्हा ते त्यांना भेटायला गेले, तेव्हा ते एकदम टापटीपमध्ये होते. दाढी-मिशी नव्हती. साधा शर्ट-पँट घालून आले होते. जॅकी आणि घई यांच्यात संवाद झाला. त्यांनी जॅकी यांना दाढी आणि मिशा वाढवण्यास सांगितले. तसेच जॅकी यांना अभिनयही येत नव्हता. नॉन ऍक्टरवर घई यांनी मेहनत घेतली. कॅमेऱ्यासमोर बोलवून पाहिलं. ऑडिशनच्या फेऱ्या झाल्या आणि सिनेमात जॅकी यांना कास्ट करण्यात आलं, पण तरीही त्यांना अभिनयाची तेवढी समज नव्हती. देव आनंद यांचा चाहता असण्यासोबतच जॅकी त्यांच्याच सिनेमात काम करून इथे आले होते. त्यामुळे देव साहेबांचा प्रभाव त्यांच्यावर जास्त होता. ती गोष्ट त्यांच्या अभिनयातही दिसून आली होती. ओळी नीट बोलता न आल्याने जॅकी हताश झाले होते. घई यांनी त्यांना एका साईडला नेले. त्यांना सांगितलं की, असुरक्षित वाटून घेण्याची गरज नाही. ते त्यांच्या सिनेमाचे नायक आहेत, आणि त्यांची जागा इतर कोणालाही देणार नाहीत, असंही सांगितलं. घई यांनी जॅकी यांच्याकडे एक डिमांड केली. ते म्हणाले की, जर तुम्हाला कॉपी करायची असेल, तर देव साहेबांपेक्षा हे पात्र शत्रुघ्न सिन्हा यांच्या झोनमध्ये आहे. घेऊन या त्यांना. जॅकी यांनी आधी तसे केले, पण नंतर त्यांना सूर मिळाला. ‘हिरो’ सिनेमा रिलीज झाल्यानंतर पुढील दोनच वर्षांत जॅकी १७ सिनेमांमध्ये काम करू लागले होते.
तर अशाप्रकारे जॅकी यांनी इंडस्ट्रीत एन्ट्री केली होती. रंजक माहिती अशी की, खूप कमी चाहत्यांना हे माहित असेल की, जॅकी श्रॉफ हे उत्तम स्वयंपाक बनवतात. आजही बॉलिवूडमध्ये त्यांच्या हातचे वांग्याचे भरीत अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दोस्तांचा दोस्त असणाऱ्या पठ्ठ्याने ‘किंग खान’च्या दोन हिरोईनी पळवलेल्या, कशा ते घ्या जाणून
आधी अभिनेत्रींना डेट करणाऱ्या ‘या’ सुपरस्टार्सना शेवटी सामान्य मुलीशी थाटावा लागला संसार
व्हिलनच्या एका फायटीमुळे अमिताभ गेले असते देवाघरी, डॉक्टरही जयाला म्हणालेले, ‘मरण्यापूर्वी शेवटचं भेटून घ्या’