आधी अभिनेत्रींना डेट करणाऱ्या ‘या’ सुपरस्टार्सना शेवटी सामान्य मुलीशी थाटावा लागला संसार

0
229
R-Madhavan-And-Shahrukh-Khan
Photo Courtesy: Instagram/actormaddy & gaurikhan

आपण पाहतो की, काही लोक आपल्या प्रतिष्ठेला शोभेल अशाच कुटुंबात आपल्या मुला-मुलीचे लग्न लावून देतात. काही असेही असतात, जे गरीब- श्रीमंत किंवा प्रसिद्धीकडे न पाहता आपल्या मुलांचे लग्न लावून देतात. बॉलिवूडचंही असंच आहे बघा. आपल्या मनात बॉलिवूड कलाकारांबद्दल वेगवेगळी मतं असतात. कुणाला वाटतं, एवढा मोठा हिरो आहे म्हणल्यावर तो लग्नही तितक्याच प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत किंवा त्याच्या दर्जाच्या मुलीसोबत करेल. काही अपवाद सोडले, तर असे काही कलाकार आहेत, ज्यांनी प्रसिद्धी वगैरे नसलेल्या सामान्य मुलीसोबत संसार थाटलाय. कोण आहेत ते कलाकार. चला जाणून घेऊया…

शाहिद कपूर
शाहिद कपूर याने कोणत्याही फिल्मी बॅकग्राऊंड नसलेल्या मीरा राजपूतसोबत ७ जुलै, २०१५ रोजी संसार थाटलाय. जेव्हा शाहिद आणि मीराचं लग्न झालं होतं, तेव्हा कुणाला आयडियादेखील नव्हती की, शाहिद कुणाला डेट करत आहे. दोघांचीही लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. बॉलिवूड अभिनेत्रींना डेट करून करून शाहिद जाम पकला होता आणि त्यानंतर काही वर्षे सिंगलच होता. त्यानंतर त्याच्या भेट मीरासोबत झाली. ती पण एका पार्टीत. तिथं मीरानं शाहिदला कोणत्याही स्टारसारखं ट्रीट केलं नाही. त्यामुळे शाहिदपण तिच्यासोबत सहजपण चर्चा करू लागला. त्याला पहिल्याच भेटीत वाटलं की, माझे आयुष्य मी या मुलीसोबत घालूव शकतो. काही भेटीगाठींनंतर शाहिदला क्लिअर झालं की, मीराच त्याच्यासाठी परफेक्ट आहे. १३ वर्षांहून लहान असूनही शाहिदला मीरा मॅच्युअर वाटली. त्यामुळे त्याने पुढे तिच्यासोबतच लग्न केलं. ते दोघेही आता मुलगी मीशा आणि मुलगा झैन या चिमुकल्यांचे आई-बाबा आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

जॉन अब्राहम
जॉन अब्राहम आणि बिपाशा बासूच्या प्रेमाचे किस्से तर सर्वांच्याच लक्षात असतील. त्यांना इंडस्ट्रीतील बेस्ट कपल म्हणून ओळखलं जात होतं, पण जेव्हा त्यांचं ब्रेकअप झालं, तेव्हा जॉनला मीडियामध्ये चांगलंच ट्रोल करण्यात आलं. बिपाशाची साथ तुटली असली, तरी जॉन अब्राहम कुठं पुढं सिंगल राहणार होता. त्याची भेट प्रिया रंचलशी झाली. प्रिया एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. प्रिया त्यावेळी एका प्रोजेक्टसाठी मुंबईत आली होती. त्यावेळी दोघांच्याही कॉमन फ्रेंड्समुळे तिची भेट जॉनसोबत झाली. त्यावेळी जॉनला प्रिया खूपच प्रोफेशनल आणि करिअर ओरिएंटेड वाटली. तिथूनच प्रियाही त्याच्या मनात बसली. काही दिवसांनंतर दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. पुढं जाऊन त्यांनी २०१४ साली लग्न केले. प्रिया ही धरमशालाची असून तिला जॉनच्या फिल्मी लाईफशी काहीही घेणं-देणं नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

शाहरुख खान
आता ‘किंग खान’ म्हणल्यावर तुम्हालाही समजलंच असेल आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत. ‘किंग खान’ म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून शाहरुख खान आहे. शाहरुख आणि गौरी खान हे सर्वांसाठी एक प्रेरणादायी कपल आहेत. शाहरुख गौरीला तेव्हा भेटला होता, जेव्हा त्याच्या ना पैसा होता, ना कोणतीही प्रसिद्धी. ते दोघेही एका पार्टीत भेटले होते. तिथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. पुढं गौरीनं शाहरुखला आणि आपल्या कुटुंबीयांची भेट घडवून दिली, तेव्हा तिच्या घरच्यांना मात्र हे नातं मंजूरच नव्हतं. शाहरुख मुस्लिम होता, तर गौरी हिंदू. शिवाय दोघे खूपच तरुणही होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना वाटलं की, आतापासूनच लग्नाबद्दल विचार करणं योग्य नाही. शाहरुख तेव्हा स्ट्रगलर होता. म्हणजे तो यशाच्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळं त्यानं आपलं हे नातं सर्वांपासून लपवून ठेवलं. पण जेव्हा तो प्रसिद्ध टीव्ही अभिनेता बनला, तेव्हा पुन्हा त्याने गौरीच्या कुटुंबाला विनंती केली आणि म्हणाला की, मी कायम तुमच्या मुलीसोबतच राहील. तुम्ही माझ्या कामावरून आणि धर्मावरून अजिबात जज करू नका. मी इतर मुलांसारखा नाहीये. गौरीसोबत लग्न करणं त्याच्यासाठी खूपच लकी ठरलं. कारण लग्नाच्या एका महिन्यातच शाहरुखला ५ सिनेमांच्या ऑफर मिळाल्या. त्यानंतर शाहरुख बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. शाहरुख आणि गौरी ३ मुलांचे आईवडील आहेत. त्यांना सुहाना, आर्यन आणि अबराम ही मुलं आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

आर माधवन
सिनेमात आपलं करिअर बनवण्यापूर्वी आर माधवन पब्लिक स्पीकर होता, जो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉप घ्यायचा. १९९१ साली जेव्हा तो असेच एक वर्कशॉप घेत होता, तेव्हा त्यात एक स्टुडंट होती, सरिता बिरजे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉपमुळे ती आपली एअर होस्टेसच्या मुलाखतीत पास झाली होती. त्यानंतर माधवनला थँक्यू बोलण्यासाठी त्याला डिनरसाठी बोलावलं आणि मग काय तिथून दोघंही एकमेकांना पसंत करू लागले होते. माधवन सांगतो की, सरिता ही त्याच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम होती. मला नव्हतं वाटलं की, ती माझ्यासारख्या डार्क रंगाच्या मुलासोबत लग्न करेल, पण तिनं केलं. दोघांनीही १९९९ मध्ये लग्नाची गाठ बांधली होती. त्यानंतर २००५ साली हे दोघेही आई-वडील बनले. त्यांना वेदांत नावाचा एक मुलगा आहे. माधवनबद्दल खास गोष्ट म्हणजे, त्याचं कोणत्याही अभिनेत्रीसोबत अफेअर समोर आलेलं नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

इमरान हाश्मी
पडद्यावर कितीही अभिनेत्रींसोबत किसींग सीन देत असला, तरीही बॉलिवूडमध्ये ‘सीरियल किसर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मी खऱ्या आयुष्यात एकाच व्यक्तीसोबत लॉयल राहिलाय. ती म्हणजे त्याची पत्नी परवीन शहानी. इमरानने १४ डिसेंबर, २००६ साली आपली लाँग टाईम गर्लफ्रेंड परवीन शहानीसोबत संसास थाटलाय. त्यावेळी परवीन ही एका शाळेत शिक्षिका होती. त्यांच्या लव्हस्टोरीला खऱ्या अर्थानं सुरुवात ही १९९६ पासून झाली होती. पुढं सिनेसृष्टीत आल्यानंतरही इमरान त्याच्या पत्नीशी लॉयल राहिला. लग्नानंतर ५ वर्षांनी त्याला अयान नावाचा मुलगा झाला. पुढं अयान ४ वर्षांचा झाला, तेव्हाच समजलं की, त्याला पहिल्या स्टेजचा कँसर झालाय. इमरान आणि परवीनसाठी तो काळ खूपच कठीण होता. पण दोघांनीही कधीच हार मानली नाही. परवीननंही इमरानला सिनेमात ऍक्टिव्ह राहायला सांगितलं. इमरान सांगतो की, जर परवीन नसती, तर तो ही सिच्वेशन सांभाळू शकला नसता. तो नॅचरली खूपच इमोशनल आहे. पण परवीननं कधीच त्याला खचू दिलं नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

तर हे आहेत ५ बॉलिवूड अभिनेते, ज्यांनी कोणत्याही प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीसोबत लग्न न करता, सामान्य मुलीसोबत संसार थाटला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
व्हिलनच्या एका फायटीमुळे अमिताभ गेले असते देवाघरी, डॉक्टरही जयाला म्हणालेले, ‘मरण्यापूर्वी शेवटचं भेटून घ्या’
‘मी हिंदुस्तानी मुलगी…’, म्हणत लंडनच्या थेटरात किस करू पाहणाऱ्या परदेशी अभिनेत्याला सुनावणारी निम्मी
जगाला वेड लावणाऱ्या ‘हॅरी पॉटर’मधील कलाकार सध्या काय करतात? एका क्लिकवर मिळेल माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here