Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बॉलिवूड सुपरस्टार्सच्या बायका होतायत ट्रोल; स्वत: छत्री घेऊन सुझेन अन् ताहिराने ड्रायव्हरला सोडले भिजत

बॉलिवूड कलाकार अनेकदा असे काही करतात, ज्यामुळे त्यांना चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागतो. आता यामध्ये ऋतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझेन खान आणि आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपचा समावेश झाला आहे. सुझेन आणि ताहिराला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले. या दोघीही मुंबईतील त्या भागात स्पॉट झाल्या, जिथे खूप जोरात पाऊस पडत होता. यादरम्यान त्यांनी आपल्या गाडीतून बाहेर पडताना असे काही केले, ज्यामुळे त्यांना नेटकऱ्यांनी धारेवर धरले. आता त्यांचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

खरं तर सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आधी सुझेन खान आपल्या गाडीतून बाहेर पडते. बाहेर पाऊस असल्याने सुझेनचा ड्रायव्हर तिला लगेच छत्री देतो. मात्र, सुझेन ड्रायव्हरची चिंता न करताच छत्री घेऊन पुढे निघून जाते. दुसरीकडे ड्रायव्हरला पावसात भिजावे लागते. सुझेननंत काही वेळाने त्याच जागी ताहिरा कश्यपला स्पॉट केले जाते. ताहिराही आपल्या ड्रायव्हरला तीच वागणूक देते. (Hrithik Roshan Ex Wife Sussanne Khan And Ayushmann Khurrana Wife Tahira Kashyap Trolled For Inhuman Behavior)

व्हिडिओत दोघींनीही ड्रायव्हरला दिलेल्या वाईट वागणुकीमुळे नेटकरी त्यांना जोरदार ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले की, “हास्यास्पद, असंवेदनशील, छत्री घेतली आणि दुसऱ्या व्यक्तीला भिजण्यासाठी सोडले.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “संपूर्ण जग मरूदे, तरीही मरण्यापूर्वीच्या आपल्या लूकसाठी पार्लरला जात राहतील.” आणखी एका युजरने ड्रायव्हरप्रती दु:ख व्यक्त करत म्हटले की, “बिचारा ड्रायव्हर.”

सुझेन खान ट्रोल होण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही ती अनेकदा आपल्या ड्रेसमुळे ट्रोल झाली आहे. ऋतिक रोशन आणि सुझेन खान बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक जोडप्यांपैकी एक होते. १४ वर्षे एकत्र घालवल्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तरीही मुलांमुळे दोघेही नेहमी एकत्र दिसतात.

हे देखील वाचा