‘या’ व्यक्तीमुळे ऋतिक रोशनला मिळाला होता ‘कहो ना प्यार है’ सिनेमा; २१ वर्षांनंतर झालाय खुलासा


‘कभी खुशी कभी गम’, ‘क्रिश’, ‘कोई मिल गया’ या चित्रपटात दमदार अभिनयाने बॉलिवूड प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे ऋतिक रोशन. ऋतिक रोशनने 2000 साली त्याच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली होती. त्याने 14 जानेवारी, 2000 रोजी ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या पहिल्याच चित्रपटाने तो रातोरात स्टार झाला होता. या चित्रपटाने त्याची बॉलिवूडमध्ये चांगलीच ओळख निर्माण झाली होती. आता जवळपास 21 वर्षानंतर आता ही गोष्ट समोर आली आहे की, कोणाच्या सांगण्यावरून ऋतिक रोशनला या चित्रपटात काम मिळाले होते. (Hrithik Roshan got a kaho na pyar hai film because of dabbu Ratnani reveal)

या दिवसात डब्बू रत्नानी खूप चर्चेत आहेत. त्यांनी त्यांच्या 2021 कॅलेंडरची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. यातच त्यांनी ऋतिक रोशनबाबत एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनीच ऋतिक रोशनचा पहिला पोर्टफोलियो शूट केला होता.

स्पॉट बॉयच्या एका मुलाखतीत डब्बू यांनी सांगितले की, त्यांनी ऋतिक रोशनचा पहिला पोर्टफोलियो शूट केला होता. त्यानंतर त्यांनी ऋतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी ऋतिक रोशनला एक अभिनेता म्हणून लॉन्च करण्यासाठीच प्रोत्साहित केले होते. डब्बू रत्नानी यांनी सांगितले की, ‘फोटोशूट झाल्यानंतर ऋतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी फोन केला आणि म्हटले की, पोर्टफोलिओ पाहून ऋतिकला चित्रपटात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.’

त्यांनी पुढे सांगितले की, ‘स्वतः ऋतिक रोशन याने त्यांना सांगितले की, त्या फोटोशूटमुळे त्याला ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. तेव्हापासून मी त्याचे फोटो काढतो.’ ऋतिक नेहमीच डब्बू रत्नानी यांच्या कॅलेंडरसाठी नवीन अंदाजात फोटो काढत असतो.

ऋतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाला आता 21 वर्ष पूर्ण झाले आहेत. 21 वर्षानंतरही या चित्रपटाची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटात राकेश रोशन हे शाहरुख खानला घेणार होते. तसेच अमिषा पटेलच्या जागी करीना कपूरला घेणार होते. परंतु चित्रपटाची शूटिंग चालू होण्याआधीच करीना कपूरने हा चित्रपट नाकारला. त्यामुळे नंतर तिच्या जागेवर अमिषा पटेलचे कास्टिंग झाले.

ऋतिक रोशनच्या या पहिल्या चित्रपटाने ‘मोहबत्तें’ आणि ‘हर दिल जो प्यार करेगा’ या चित्रपटांना मागे सारले होते. ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट त्यावेळी सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाला 102 पुरस्कार मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गायिका बिली ईलिशला आशियायी लोकांची खिल्ली उडवणे पडले महागात; पोस्ट शेअर करत मागावी लागली माफी

-जेव्हा बिग बींनी नाईलाजाने बांधली होती शर्टाची गाठ; फॅशन समजून चाहत्यांनीही केली नक्कल, आता सांगितला किस्सा

-‘पाऊस, निसर्ग आणि मी…’, म्हणत चिखलात चालताना दिसली मराठमोळी प्राजक्ता माळी


Leave A Reply

Your email address will not be published.