‘हे करायला मी खूप घाबरायचे…’, म्हणत व्हिडिओमध्ये ‘तीच’ गोष्ट करताना दिसली ऋता दुर्गुळे


‘फुलपाखरू’ मालिकेत काम करून अभिनेत्री ऋता दुर्गुळे घरघरात पोहचली. या मालिकेने प्रेक्षकांना प्रेम करण्यासाठी एक नवा गोड चेहरा दिला. बोलके डोळे असणारी ऋता महाराष्ट्राची ‘क्रश’ आहे, असे म्हणणे कदाचित चुकीचे ठरणार नाही. या दिवसांत ती सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे निरागसतेने भरलेले फोटो नेहमीच चाहत्यांना भुरळ पाडतात. आता अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे, जी गोष्ट करायला अभिनेत्री घाबरायची, ती गोष्ट तिने या व्हिडिओमध्ये केलेली पाहायला मिळत आहे. यात ऋता गाणे गाताना दिसली आहे. होय अभिनेत्रीला कोणासमोर गाणे गायची भीती वाटायची. मात्र आता हा व्हिडिओ शेअर करत, तिने या भीतीलाही राम राम ठोकल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऋताचा एक मित्र गिटार वाजवत आहे, तर ती त्याच्यासोबत गाणं गात आहे. मित्रानेच तिला तिची भीती घालवायला प्रेरित केले आहे, असे तिने या पोस्टद्वारे सांगितले आहे.

ऋताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “मला हे करायला खूप भीती वाटायची. परंतु तो म्हणतो की, आपल्याला ज्याची भीती वाटते तेच आपण करायचं! म्हणून मी माझे सर्वात आवडते गाणे ‘गाण्याचा’ प्रयत्न केला. बडे अच्छे लगते हैं” चाहते व्हिडिओला भरभरून प्रेम देत आहेत. शिवाय प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्रने देखील तिच्या या व्हिडिओवर कमेंट करून तिचे कौतुक केले आहे.

ऋताच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘दुर्वा’ आणि ‘फुलपाखरू’ या मालिकांमध्ये काम करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. ती ‘सिंगिंग स्टार’ या रियालिटी शोमध्ये झळकली आहे. शिवाय तिने ‘स्ट्रॉबेरी शेक’ या शॉर्टफिल्ममध्येही काम केले आहे. विशेष म्हणजे आता अभिनेत्री रवी जाधवच्या ‘टाईमपास ३’ मध्ये झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…चला परत जाऊया बालपणात’, म्हणत चित्र रंगवताना दिसली अभिनेत्री तेजश्री प्रधान

-हा नक्की फोटो आहे की व्हिडिओ? तेजस्विनी पंडितची लेटेस्ट पोस्ट पाहून चक्रावले नेटकरी

-‘३६५ डे’ फेम मिशेल मोरोनचे खासगी फोटो सोशल मीडियावर लीक; अभिनेत्याने पोस्ट शेअर करत व्यक्त केला राग


Leave A Reply

Your email address will not be published.