Wednesday, June 25, 2025
Home मराठी काय सांगता! ऋता दुर्गुळे करणार लग्न? इंस्टाग्रामवरील ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

काय सांगता! ऋता दुर्गुळे करणार लग्न? इंस्टाग्रामवरील ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

सध्या झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका चांगलीच गाजत आहे. मालिकेसोबत मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे कलाकार अभिनेता अजिंक्य राऊत आणि ऋता दुर्गुळे हे देखील तुफान लोकप्रिय आणि प्रसिद्ध होत आहेत. त्यांची जोडी आणि त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडत असून ताशा कमेंट्स सोशल मीडियावरही आपल्याला पाहायला मिळत आहे. ऋताची ओळख सर्वत्र महाराष्ट्राची क्रश अशी तयार झाली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिने ती रिलेशनमध्ये असल्याची माहिती सर्वांना दिली. तिने ही बातमी दिल्यानंतर तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता.

ती मागील काही वर्ष गुजराती दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अशातच तिने इंस्टाग्राम स्टोरीला प्रतीक शाहसोबत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो आणि तिने दिलेले कॅप्शन सध्या तुफान चर्चेत आले असून, त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. ऋताने प्रतिकसोबत फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “18 daystogo” या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला‌ ‘तू ऐसा कैसा है’ हे गाणे ऐकू येत आहे. या फोटोमुळे आणि कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. सगळेजण असा विचार करत आहे की, ऋता १८ दिवसानंतर प्रतीक शाहसोबत लग्न करणार आहे. तसेच काहीजण म्हणत आहेत की, ती कदाचित साखरपुडा करणार आहे. तिच्या या पोस्टमुळे आता तिच्या लग्नाची चर्चा चालू झाली आहे. ( Hruta durgule marriage after 18 days? Instagram post viral)

Photo Courtesy Instagramhruta12

ऋता ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे लाखांमध्ये फॉलोवर्स असून, तिने या आधी ‘फुलपाखरू’ आणि ‘दुर्वा’ या मालिकेत काम केले आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेने तिला खूप ओळख दिली. तिचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. तसेच तिने ‘दादा एक गुड न्युज आहे’ या नाटकात देखील काम केले आहे. तिचे हे नाटक देखील सध्या हाऊसफुल्ल आहे. अनेकांना हे नाटक आवडत आहे. या नाटकाच्या निमित्ताने तिने नाटकांमध्ये पदार्पण केले आहे.

हेही वाचा- 

भोजपुरी सुपरस्टार पवनसिंगच्या आगामी गाण्याच्या टिझरचा सोशल मीडियावर धुमाकूळ, काही काळातच टिझर ट्रेंडिंगमध्ये

रस्त्यावर लोकांना थांबवून थांबवून फुलं देताना दिसला कार्तिक आर्यन, पण काय आहे कारण?

BIGG BOSS 15: राखी सावंतच्या पतीने केला मोठा खुलासा, स्वतः च्या भूतकाळाबद्दल सांगितले ‘असे’ काही

हे देखील वाचा