ऋता दुर्गुळे होत आहे साखपुड्यासाठी तयार, भावी नवरीचा गोड लूक व्हायरल


झी युवा या वाहिनीवरील ‘फुलपाखरू‘ या मालिकेला आख्ख्या महाराष्ट्राने अगदी डोक्यावर घेतले होते. या मालिकेने विशेषतः तरुण वर्गाला भुरळ घातली होती. यासोबत या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिला देखील खूप लोकप्रियता मिळाली. तिचे निखळ सौंदर्य, गोड हसू यासोबत गालावर पडणारी छोटीशी खळी यावर अवघा तरुणवर्ग भुलला होता. तसेच मालिकेत वैदेही आणि मानसची जोडी आणि त्यांची प्रेम कहाणी देखील चांगलीच लोकप्रिय झाली होती.

या मालिकेनंतर तिला खूप लोकप्रियता मिळाली. ऋता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच शुक्रवारी (२४ डिसेंबर) रोजी ऋता (Hruta Durgule) तिचा बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत (pratik shah) साखरपुडा आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून काहीतरी खास असणार आहे, याची माहिiती दिली होती. अशातच तिच्या साखरपुड्याची माहिती समोर आली आहे. तिचा साखरपुड्यासाठी तयार होताना एक व्हिडिओ समोर आला आहे. (hruta durgule’s engagement look viral on social media)

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक मेकअप आर्टिस्ट तिचा मेकअप करत आहे. ऋताने सुंदर अशी साडी नेसली आहे. गळ्यात छोटेसे दागिने आणि नाकात नथ घातली आहे. या लूकमध्ये ती अत्यंत साधी आणि तेवढीच सुंदर दिसत आहे. तिचा साखरपुड्याचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत आणि तिचे अभिनंदन करत आहेत.

ऋताने मेहेंदी काढल्यानंतर देखील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. ऋताने तिचे हे नात्याबाबत खूप मोठे गुपित ठेवले होते. मागील महिन्यात तिने तिच्या नात्याची सोशल मीडियावर कबुली दिली. ती सध्या झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिची भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

हेही वाचा :

काय सांगता! ‘अनुपमा’ मालिकेत होणार सारा अली खानची एन्ट्री, वाचा सविस्तर

‘काय कुठे काय करते’ मालिकेतील मधुराणी प्रभुलकर एका एपिसोडसाठी घेते ‘एवढी’ रक्कम, घ्या जाणून

मुलीच्या लग्नात धमाकेदार डान्स करणाऱ्या दिलीप जोशी यांच्या डान्सचा एक अनसीन व्हिडिओ झाला व्हायरल

 

 


Latest Post

error: Content is protected !!