Thursday, April 25, 2024

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील मधुराणी प्रभुलकर एका एपिसोडसाठी घेते ‘एवढी’ रक्कम, घ्या जाणून

स्टार प्रवाहावरील ‘आई कुठे काय करते‘ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. मालिकेतील विषय अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असून देखील लेखकाने या विषयाची मांडणी अगदी उत्तमरीतीने केली आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र महाराष्ट्रभर गाजत आहे. प्रत्येक पात्राला खास अशी ओळख मिळत आहे आणि हीच या मालिकेची खासियत आहे की, प्रत्येक पात्राला एक विशिष्ट दर्जा आहे. अनेक मालिकांना मागे सारून या मालिकेने टीआरपीच्या यादीत स्थान निर्माण केले आहे.

मालिकेत मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) मुख्य भूमिकेत आहे. तिने तिचे पात्र अगदी उत्तमरित्या निभावले आहे. अत्यंत साधे सरळ आणि नेहमीच दुसर्यांचा विचार करणारी टेलिव्हिजनवरील ही आई आज घराघरात पोहचली आहे. साधी सरळ, मुलांवर आणि कुटुंबावर ती जीवापाड प्रेम करत असते. परंतु आयुष्यात असे काही प्रसंग येतात की, ती तिच्या या कुटुंबातून बाहेर येऊन स्वतंत्र आयुष्य जगायला लागते. तिची ही भूमिका समस्त स्त्री वर्गाला प्रेरणा देणारी आहे. (aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar per episode income)

मालिकेत तिची भूमिका पाहून अनेकांना हा प्रश्न पडला असेल की, ती या मालिकेत किती मानधन घेत असेल चला तर जाणून घेऊया मधुराणी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेते. ती एका एपिसोडसाठी २५ हजार एवढे मानधन घेते.

मधुराणीने याआधी देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. परंतु या मालिकेने आणि आई या पात्राने तिला खूप ओळख निर्माण केली आहे. तिच्या अरुंधती या पात्राला खूप ओळख मिळत आहे. याआधी तिने ‘सुंदर माझं घर’, ‘गोड गुपित’, ‘समांतर, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘मणी मंगळसूत्र’ यांसारख्या मराठी चित्रपटात काम केले आहे. या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले ही खलनायिकेच्या भूमिकेत आहे. तिचे पात्र नकारात्मक आहे, तरी देखील तिच्या चाहत्यांना तिचे पात्र खूप आवडत आहे. या मालिकेचा हिंदीमध्ये रिमेक देखील आहे. या मालिकेचे नाव ‘अनुपमा’ हे आहे.

हेही वाचा :

‘८३’ चित्रपटाच्या निर्मात्यांना बसणार मोठा फटका, प्रदर्शित होताच लीक झाला चित्रपट

मुलीच्या लग्नात धमाकेदार डान्स करणाऱ्या दिलीप जोशी यांच्या डान्सचा एक अनसीन व्हिडिओ झाला व्हायरल

चाहत्यांच्या घोळक्यात अडकलेल्या आलियासाठी रणबीरने करून दिली वाट; तुम्हीही म्हणाल, ‘काळजी असावी तर अशी’ 

 

हे देखील वाचा