Tuesday, June 25, 2024

बिहारमध्ये अक्षरा सिंगची झलक पाहण्यासाठी चाहते झाले बेभान, अभिनेत्री म्हणाली ‘माझा जीव घेऊन टाका!’

भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्री अक्षरा सिंग सध्या तिचा आगामी चित्रपट ‘सबका बाप अंगुठा छाप’मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दिनेश लाल यादव निरहुआ आणि श्रुती राव देखील काम करताना दिसणार आहेत. अलीकडेच, अक्षरा तिच्या सहकलाकारासह प्रयागराजच्या रस्त्यावर थिरकताना दिसली, जिथे ती चित्रपटाच्या गाण्यासाठी रिहर्सल करत होती. ती बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यात पोहोचली आणि त्याच दरम्यान तिला पाहण्यासाठी हजारो चाहते जमा झाले.

अक्षराने तिच्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचे चाहते मोठ्या संख्येने दिसत आहेत. ही पोस्ट शेअर करत तिने जहानाबादच्या चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेम आणि आदराबद्दल आभार व्यक्त केले आहेत. यासोबतच चाहत्यांची गर्दी पाहून तिने “बास आता माझा जीवच घ्या” असे लिहिले आणि पुढे मिठी मारण्याचा इमोजी बनवला. तिचा हा व्हिडिओ २ लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये अक्षराची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे आणि प्रत्येकजण हात वर करून तिला शुभेच्छा देत आहे.

अक्षराला भोजपुरी सिनेसृष्टीतील ‘सिंहिण’ अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. ती इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे, जी तिच्या अभिनयानेच नव्हे, तर डान्स आणि सौंदर्याने लाखो हृदयांवर राज्य करते. ती तिच्या व्हिडिओ गाण्यांद्वारे प्रेक्षकांना प्रभावित करते आणि तिच्या स्टाईलिश अंदाजाद्दल जितके बोलावे तितके कमीच आहे.

प्रदीप के शर्मा यांच्या ‘सबका बाप अंगूठा छाप’ या चित्रपटाचे निर्माते अनिता शर्मा आणि पद्मा सिंग सहनिर्माते आहेत. अक्षरा तिच्या आगामी ‘सबका बाप अंगूठा छाप’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. बाबा मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटात दिनेश लाल यादव निरहुआ, अक्षरा सिंग, श्रुती राव, संजय पांडे, संजय महानंद, पद्मा सिंग आणि इतर अनेक कलाकार आहेत. पराग पाटील या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

अक्षराच्या नवीन म्युझिक अल्बम ‘अखियों से गोली मारब’ मधील ‘टुकूर टुकूर टाका ना’ या गाण्याच्या व्हिडिओलाही सध्या चांगलीच पसंती मिळाली आहे. लवकरच ती तिच्या चाहत्यांसाठी आणखी काही नवीन चित्रपट आणि गाणी प्रदर्शित करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा